Monday, July 5, 2021

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात साप


जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य प्रवेद्वाराजवळच हा प्रकार घडला. आवारातील हिरवळ व त्याच्या लगतच्या झुडपात हा साप लपुन बसला होता. एका कर्मचार्याच्या निदर्शनास आल्यानंतर काठीच्या साहाय्याने त्याने साप बाहेर काढला. महिला पोलिस कर्मचारी अर्चना काळे यांनी मोठ्या शिताफीने साप पकडला. मात्र, साप अतिशय चपळ असल्याने तो हातातून निसटून हिरवळीच्या झुडपात निघून गेला. पोलिस कर्मचारी काळे व इतर कर्मचारी सुमारे तासभर  शोध घेत होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only