Tuesday, July 20, 2021

ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त; नियम पाळण्याचे एसपीचे आवाहन ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त; नियम पाळण्याचे एसपीचे आवाहन

नगर दि.20 प्रतिनिधी


उद्या सर्वत्र बकरी ईद साजरी केली जाणार असून ईद साजरी करताना पोलीस प्रशासनाने जिल्हाभरा मध्ये विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. नागरिकांनी कुठेही रस्त्यावर हा सण व उत्सव साजरा करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केलेले आहे.


या संदर्भामध्ये अधीक्षक पाटील म्हणाले की, ईद चा सण उद्या सर्वत्र साजरा होत आहे. कोरोना चे संकट असल्यामुळे सण व उत्सव साजरे करण्यामध्ये निर्बंध घालण्यात आलेले आहे. जे काही नियम आहेत त्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. 

ईद च्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये विशेष असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यामध्ये एसआरपीएफची एक तुकडी, तसेच सहाशेहून अधिक होमगार्ड हे बंदोबस्तामध्ये राहणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या त्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश सुद्धा दिले असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. उत्सव साजरा करताना आता जे नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, ईद साजरी करत असताना नागरिकांनी हा सण घरामध्येच साजरा करावा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन उत्सव साजरा करावा, कुणीही रस्त्यावर येऊन हा सण साजरा करु नये, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only