Monday, July 12, 2021

मोदींना माझे काम आवडले, तर मलाही मंत्रिपदाची संधी- खा.विखेमोदींना माझे काम आवडले, तर मलाही मंत्रिपदाची संधी- खा.विखे

नगर दि 12  प्रतिनिधी

कायकर्त्यात्च्या भावनेचा आदर नेहमीच करत असतो, यंदाच्या केंद्रीय विस्तारामध्ये  संधी मिळाली नसली उद्या जर माझे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगले वाटले तर ते मला निश्चितपणे संधी देतील असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केले.


 सावेडी येथे आरोग्य केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. खा.विखे म्हणाले की नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला आहे अनेक नवीन चेहऱ्यांना युवकांना यामध्ये संधी देण्यात आलेले आहे. देशांमध्ये साडेतीनशे खासदार भाजप मित्र पक्षांचे निवडून आलेले आहेत. त्यामध्ये 70 जणांना मंत्री करायचे असते. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळते असे नाही कार्यकर्त्यांनी मला मंत्री पद मिळावे अशा भावना व्यक्त केल्या असतील मात्र जर मी खासदार म्हणून चांगले काम केले असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चितपणे मला संधी देतील असेही सुजय विखे म्हणाले.


खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही म्हणून त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची प्रीतम मुंडे हे समजत काढतच आहे. पंकजा मुंडे या केंद्रीय भाजपच्या समितीवर आहेत. त्या दिल्ली येथे पक्ष बैठकीला गेलेल्या आहेत. त्यांची नाराजी नाही हे सांगितलेले आहे .त्यामुळे फक्त कार्यकर्त्यांचा भावनांचा विषय असल्यामुळे व ते पदांचे राजीनामे देत असल्यामुळे मुंडे त्यांना निश्चितपणे समजावून सांगतील असेही ते म्हणाले.


पेट्रोल दरवाढीच्या संदर्भात विरोधक आता मोर्चे आंदोलन करत असतील पण हे करत असताना केंद्र सरकारने मोफत लसीकरण यासह अन्य विषय सुद्धा  हाताळलेले आहेत व त्यांना सवलती पण दिलेल्या आहेत हे  लक्षात घ्यावे असेही खासदार विखे यांनी म्हटले आहे.


राज्यामध्ये आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही. जे कोणी  बोलत आहेत.तो एक विनोद आहे. त्यांचा केवळ दिखाऊपणा आहे. एकमेकांबद्दल फक्त ते बोलत असतात ही एक प्रकारची धूळफेक आहे, असा आरोप विखे यांनी केला. हे तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढतील,  मात्र लोकसभेला एकत्र येतील असा दावा त्यांनी केला.मराठा व ओबीसी आरक्षणाचा  सध्या विषय चर्चेत आहे, त्यामध्ये सुद्धा आरोप-प्रत्यारोप होत आहे. मात्र नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने  समान नागरी कायद्या विषयी मत स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात सुद्धा लोकसभेमध्ये चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only