Wednesday, July 7, 2021

नगर शहरात चौघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल


नगर शहरात चौघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल


घासगल्ली येथे घासाच्या पेंढ्या उचलून नेल्याचा जाब विचारल्यामुळे चौघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी (दि.7) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच ते सहा आरोपींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


निसार बडेसाब सय्यद (रा.बाराइमाम कोठला) यांनी फिर्याद दिली आहे. सय्यद यांचा घासविक्रीचा व्यवसाय असून, काल सकाळी ते घासगल्ली येथे त्यांचा पुतण्या दिशान याच्यासह व्यवसाय करत होते. यावेळी जाफर उमर शेख याच्या मुलाने घासविक्रीसाठी ठेवलेल्या पेंढ्या उचलून एका दुसर्‍या गाळ्यात नेऊन टाकल्या. सय्यद यांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने सय्यद यांच्याशी वाद घालत ‘रुको मेरे बाप को बुलाता हूँ’ म्हणत तेथून निघून गेला. काही वेळातच जाफर उमर शेख याने तेथे येवून ‘मेरे बच्चे को बोलने हिंमत कैसे की, तेरा जादा हुआ हेै, मै तुझे खतम कर दुंगा’ असे म्हणत सय्यद याच्यावर कोयत्याने वार केला. यात सय्यद यांच्या हाताला गंभीर जखम झाली. जाफर शेख व त्याच्या मुलाने व इतर साथीदारांना पुन्हा कोयता व चॉपरने मारहाण करण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद यांचा पुतण्या दिशान वाचविण्यासाठी आला. त्यालाही मारहाण झाली. या दोघांना सोडविण्यासाठी आलेल्या सय्यद यांचा भाऊ व पुतण्यालाही त्यांनी मारहाण केली.


या प्रकरणी तोफखाना पोलिसात खुनाचा प्रयत्न करणे, दंगा करणे आदी प्रकरणांबाबत जाफर उमर शेख, त्याचा मुलगा (नाव माहिती नाही), त्याच्या दोन बहिणी (नावे माहिती नाही), शेख याचा दाजी जमालुद्दीन, भाचा मुजम्मील (सर्व रा.कोठला, नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only