Friday, July 9, 2021

बोल्हेगावात हप्त्याची मागणी करत मारहाण एक आरोपी फरार तर एका आरोपीला केली पोलिसांनी अटक

 


बोल्हेगावात हप्त्याची मागणी करत मारहाण एक आरोपी फरार तर एका आरोपीला केली पोलिसांनी अटक

नगर -दि 9 प्रतिनिधी


तुला हप्ता द्यावे लागेल, पैसे दिले नाही  सतुर डोक्यात घालेन, अशी धमकी देत दुकानादाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली. बोल्हेगाव परिसरात ही घटनाघडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी  योगेश शिवाजी आव्हाड (वय -३६ रा.बोल्हेगाव) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजय भगवान कुर्‍हाडे,  प्रदिप कदम अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.

 याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  दिनांक ०८/०७/२०२१ रोजी दुपारी ०४/३० वा व सायंकाळी ०६/०० वा चे अमोल प्रदिप कदम व विजय भगवान कुर्‍हाडे  हे आंबेडकर चौक बोल्हेगाव येथील फिर्यादीच्या चिकन-मटण - माशाच्या दुकानात आले. दुकानातील कामगारा नवाज शेख व अन्सार शेख यांना दररोज ५०० रु हप्ता द्या असे हप्ता नाही दिला तर सतुर डोक्यात घालीन अशी धमकी देवुन त्यांना शिवीगाळ दमदाटी केली.  तसेच बळजबरीने त्यांच्याकडुन ५० / रुपये काढुन घेतले. तसेच सायंकाळी ०६ वाजण्याच्या सुमारास वरील दोघे तेथे आले. त्याठिकाणी गर्दी मध्ये उभा असलेला असीफ कदीर पठाण व माझ्यावर विजय कुर्‍हाडे याने कोयता काढुन माझ्या अंगावर त्याच्या हातातील कोयत्याने वार केला. परंतु मी डावा हात आडवा घातल्याने तो कोयता माझ्या डाव्या हाताला लागला. त्या दोघानी मला लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन अमोल प्रदिप कदम याने माझ्या खिशातील ७००  रु काढुन घेतलेले आहे. त्यावेळी ते दोघे पळुन जावु लागले. तेव्हा तेथे जमलेल्या लोकांनी त्या दोघाना माराहाण करुन अमोल प्रदिप कदम यास लोकांनी पकडले व गर्दीचा फायदा घेवुन विजय कु - हाडे कोयता घेवुन पळुन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी ३९७,३८६,३२३,५०४,५०६,३४,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. मूंढे करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only