Thursday, July 15, 2021

जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखलनगर दि. 15 प्रतिनिधी 


दिल्लीगेट येथील जागा मी खरेदी केलेली आहे, तिथे तुझा काय संबंध, असे म्हणत या ठिकाणी असलेल्या टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध  तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान या प्रकरणी भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.


 आरोपींमध्ये श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे,  यांचा समावेश आहे. ०९ जुलै २०२१ रोजी १२.३० वाजाण्याच्या सुमारास ही घटना घडली.


भागीरथ भानुदास बोडखे हे मजुरी करणारे कामगार दिल्लीगेट येथे ज्युस विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून करत आहे.

गिरीष तुकाराम जाधव  (रा.बागरोजा हडको) हे त्यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. सुमारे ५ वर्षापासुन भागीरथ बोडखे ज्यूस सेन्टरचे कामकाज पाहत असुन त्याचे मोबादल्यात गिरीष जाधव हे त्यांना दरमहा १००० रुपये पगार देतात. सदर ज्युस सेन्टरवर भागीरथ यांनी दि 9 जुलै रोजी  शटर  उघडुन बाहेर झाडलोट करून साफसफाई केली व दुकानाचे कामकाज सुरु केले, असता दुपारच्या वेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे असे त्या ठिकाणी आले, भागीरथ याना शिविगाळ करु लागले. त्यांचे सोबत सुमारे ३० ते ४० लोक होते. या ठिकाणी छिंदम याने तेथे एक क्रेन व JCB पण आणला होता. त्यावेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे, राजेंद्र म्याना यांनी  ज्यूस सेन्टरमध्ये धुडगूस घातला व त्या ठिकाणी असलेले साहित्य त्यांनी फेकून दिले होते.


दुकान मालक गिरीष जाधव यांना फोन करुन सदरचा प्रकार भगीरथ यांनी सांगितला असता त्यावेळी गिरीश जाधव यांनी मी बाहेर गावी आहे मी लवकर येईल असे सांगितले. सदरचा प्रकार घडल्यानंतर भागीरथ याने आपल्या पत्नीला व मुलाला या ठिकाणी तात्काळ येण्यास सांगितले होते. मागोमाग ज्यूस सेन्टरच्या पाठीमागील म्हस्के क्लासचा वॉचमन संतोष साठे व माझा मित्र सलिम अहमद शेख हे पण तेथे आले. त्यावेळी श्रीपाद शंकर छिंदम याने येथील भागीरथ याला तुझे सामान उचल, ही जागा मी घेतली आहे, चपला शिवायचे सोडुन हे काम कुठ करतो चामट्या, लई माजला तू असे म्हणाला.  श्रीकांत छिंदम याने सुद्धा त्यास चांभारड्या माजलास का, ताबडतोब सामान बाहेर काढ, अशी जातीवाचक शिविगाळ करुन दमबाजी तेथे  केली. त्याच दरम्यान त्यांचे सोबत असलेल्या इतर २ जणांनी तु जर आत्ताचे आत्ता सामान बाहेर काढले नाही, तर तुला बघुन घेवू, अशी धमकी दिली व शिविगाळ केली.


त्यावेळी ज्युस सेन्टरसाठी लागणारे आवश्यक सामानाची नुकसान होवू नये, म्हणून भागीरथ यांनी त्या सर्वांना विनंती केली की, सामान नविन घेतलेले आहे, मी काढून घेतो, मला थोडा वेळ द्या. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रतिक हा पण त्यांच्या पाया पडत होता. परंतु त्या सर्वांनी त्यांचे काही एक न ऐकता ज्यूस सेन्टर मध्ये उरलेले सामान फेकून दिले व त्यांच्या गल्यात असलेले धंद्याचे ५००० रुपये व यांच्या नातुला सोन्याची चैन घेण्यासाठी आणलेले २५,००० रुपये असे एकुण ३०,०००/- रुपये श्रीपाद शंकर छिंदम याने काढुन घेतले. तसेच चांभारड्या व्हय बाहेर, असे म्हणून धक्के मारुन त्यांना तेथून हुसकावून दिले. भागीरथ, त्यांची पत्नी व मुलगा असे मागील रस्त्याने मोकळ्या जागेतून मारायच्या भितीने निघुन जात असतांना श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांनी व त्यांचे सोबत असलेल्या ३० ते ४० लोकांनी मिळुन त्यांची दिल्लीगेट ज्यूस सेन्टरची टपरी JCB च्या सहाय्याने तोडून तिचे पत्रे चेपुन तिला तेथुन उचलून मागच्या बाजुला मोकळ्या जागेत टाकून दिले व त्या ठिकाणी नविन पत्र्याची टपरी ही क्रेनच्या सहाय्याने सदर जागेवर ठेवली. अशा एकुण १२ नविन पत्र्याच्या टप-या क्रेनच्या सहाय्याने त्या ठिकानी परिसरात ठेवून ते सर्व लोक निघून गेले. भागीरथ यांच्या परिचयाचे ज्या ४ लोकांनी त्यांच्या ज्यूस सेन्टरमध्ये येवून जातीवाचक शिविगाळ केली त्या सर्वांना माहित होते की भागीरथ हे चांभार जातीचे आहेत.


भागीरथ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी 392, 448, 451,143,147,149, 427,504,506, अ .जा. अ ज  2015 चे कलम 3(1) (r). Z a ( e) अशा अट्रोसिटी सह  इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास ढुमे करत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only