Saturday, July 17, 2021

तीन हातभट्टी विक्रेत्यांवर तोफखाना पोलिसांचे छापेतीन हातभट्टी विक्रेत्यांवर तोफखाना पोलिसांचे छापे

नगर : सावेडी उपनगर परिसरात तोफखाना पोलिसांनी तीन हातभट्टी विक्रेत्यांवर छापे टाकत कारवाई केली आहे. बोल्हेगाव येथे दोन ठिकाणी तर भिस्तबाग चौकात एका हातभट्टी विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बोल्हेगाव येथील मारुती मंदीराजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला हातभट्टीची विक्री करणार्‍या भानुदास मारुती शिंदे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव) याच्यावर पोलिसांनी कारवाई करत 20 लीटर हातभट्टीची दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिस हवालदार सचिन उत्तम जगताप यांनी फिर्याद दिली आहे. तर बोल्हेगाव येथेच संभाजीनगर परिसरात पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला हातभट्टी विक्री करणार्‍या संभाजी गोविंद साठे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याच्यावर पोलिसांनी कारवाई करत 25 लीटर हातभट्टीची दारु जप्त केली. पोलिस नाईक वसीमखान रशीदखान पठाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच भिस्तबाग चौकाजवळ लालगुलाब कॉलनी येथील शेतात हातभट्टी विक्री करणार्‍या गणेश रामदास पवार (रा.लालगुलाब कॉलनी) याच्यावर पोलिसांनी कारवाई करत 20 लीटर हातभट्टीची दारु जप्त केली. या प्रकरणी शैलेश उत्तमराव गोमसाळे यांनी फिर्याद दिली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only