Friday, July 2, 2021

माजी नगरसेविकेला शिवीगाळ तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलमाजी नगरसेविकेला शिवीगाळ

नगर -


अहमदनगर महापालिकेच्या माजी नगरसेविका सारिका भूतकर यांना शिवीगाळ करत त्यांचे पती हनुमंत भूतकर यांना तलवार दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विकी कांबळे, अनिल घोरपडे आणि अनोळखी दोन इसमांचा  समावेश आहे.


हनुमंत भूतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवार दि. 1 जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मी घरात असताना घराबाहेर विकी उर्फ सुरज राजू कांबळे (रा. भूतकरवाडी, अहमदनगर), अनिल घोरपडे आणि इतर दोन अनोळखी इसम आले. आरोपींनी घरासमोर उभे राहून तुम्ही आमच्यावर केस करता का?, असे म्हणून मला व माझी पत्नी सारिका भुतकर हिस शिवीगाळ करून मला तलवार दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only