Sunday, July 25, 2021

चारचाकी वाहन चोरणारी तिघांची टोळी जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई
नगर दि 25 प्रतिनिधी

नगर शहरात तपोवन रोड परिसरातून चारचाकी वाहन चोरणार्या तिघांची टोळी तोफखाना पोलिसांनी जेरबंद केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली.

प्रणव बाळासाहेब जगदाळे (वय २० वर्षे रा. भारत पंपाचे मागे गरवारे चौक, एम. आय. डी. सी. अ.नगर), कृष्णा अशोक सरोदे (वय ३० वर्षे रा. घोरपडे हॉस्पीटल शेजारी, दिल्ली गेट नगर), प्रसाद यशवंत बनकर (वय २२ वर्षे रा. प्रतिमा कॉलनी, पाईपलाईन रोड, नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची स्कॉर्पीओ गाडी (क्र MH १६ AT ४४९१) अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.  गुन्हयाचा तपास करीत असताना साक्षीदाराणे पोलिसांना माहिती दिली. गुन्हा घडताना त्यांच्या कॉलनी मध्ये तीन इसम संशयीतरित्या फिरत होते, असे सांगितले. सदर गुन्हयाचे तपासात आरोपीचा शोध घेण्यासाठी एवढाच एक आधार होता. सदर गुन्हयाचा तपास करण्यासाठी गुप्तबातमीदाराना माहीती देवून, तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळविण्यात आली. यातून एक संयशीत व्यक्तीची माहिती मिळाली व त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचे नाव  प्रणव बाळासाहेब जगदाळे सांगितले तसेच. तो माहिती देत नव्हता, तेव्हा त्यास विश्वासात घेवून त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच त्याचेकडून चोरीला गेलेली स्कॉर्पीओ जप्त करण्यात आली आहे.

सदरचा गुन्हा करताना माझ्यासोबत साथीदार  कृष्णा अशोक सरोदे व प्रसाद यशवंत बनकर 
असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी सदर गुन्हा आम्ही एकत्र मिळुन केला असल्याचे कबुल केले आहे.

सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक .मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागिय पोलीस अधिकारी, शहर विभाग उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे डी बी पथकातील पो.उप निरीक्षक सुरज मेढे, शकील सयद,  अविनाश वाकचौरे,  वसीम पठाण,  अहमद ईनामदार,  शैलेश गोमसाळे,  सचिन जगताप,  अनिकेत आंधळे यांनी केली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only