Sunday, July 25, 2021

व्हिडीओ कॉलवरुन अश्लिल कृत्य; तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल


 नगर : शहरातील एका महिलेला व्हिडीओ कॉल करुन त्यावर अश्लिल कृत्य करत अश्लिल मेसेज पाठविणार्‍या एका व्यक्तीविरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रविवारी (दि.25) सकाळी व दुपारी ही घटना घडली. एका महिलेला तिच्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल आला. त्यावर समोरच्या व्यक्तीने अश्लिल कृत्य केले. त्यानंतर दुपारी दोन वेळा अश्लिल मेसेज पाठवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सदर मोबाईल क्रमांक धारकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकत तपास तोफखाना पोलिस करत आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only