Monday, July 5, 2021

त्या डॉक्टरांना नगरच्या गुन्ह्यात केले जाणार वर्ग




 नगर दिनांक 06 प्रतिनिधी 

नगर अर्बन बँकेच्या पुणे येथील शाखेतून 22 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरण करण्यात अटक करण्यात आलेलयामध्ये नगरच्या तीन डॉक्टरांचा समावेश आहे.  त्या तीन जणांचा  जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे  दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . येत्या दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या डॉक्टरांना या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.


आरोपीमध्ये डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे यांचा समावेश आहे.


नगर अर्बन बँकेच्या 22 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये आठ आरोपींचा समावेश होता ,यामध्ये नगरच्या तीन डॉक्टरांचा सुद्धा समावेश होतो. पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने  तपासामध्ये अनेक बाबी पुढे आल्या आहेत या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये सहा कोटी चार लाख रुपये वर्ग झालेले होते .या प्रकरणांमध्ये सुरुवातीला त्यांना पोलिस कोठडी मिळाली होती, त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली, डॉक्टरांच्या वतीने न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. दिनांक 2 जुलै रोजी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले.


नगर येथे दाखल करण्यात आलेल्या  अर्बन बँकेच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वरील तीन डॉक्टरांचा समावेश असल्यामुळे त्यांना आता नगरच्या त्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .येत्या दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना नगरच्या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only