Sunday, August 8, 2021

निर्णयाविरुद्ध आता न्यायालयामध्ये सरकार अपील दाखल करणार नगर दिनांक 8 प्रतिनिधी


 नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्याचा कोठेवाडी येथे  अत्याचाराच्या घटना घडली होती, या घटनेमध्ये सत्र न्यायालयामध्ये सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती, परंतु मोक्का अंतर्गत  कायद्यानुसार मुख्य आरोपी सगळे सुटले नाही काही जणांच्या बाबतीत मोक्का  कायद्याच्या संदर्भात कायद्याचे स्वरूप बदलल्यामुळे   त्याची मुक्तता करण्यात आली या निर्णयाविरुद्ध  आता न्यायालयामध्ये सरकार  अपील दाखल करणार असल्याचे विधान परिषदेचे उपसभापती  नीलम गोऱ्हे  यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. तसेच कोठेवाडी येथील ग्रामस्थ महिलांनी शस्त्र परवान्याची मागणी केली असून ती तात्काळ मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.


नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथे वीस वर्षापूर्वी अत्याचाराची घटना घडली होती, राज्यभर हे प्रकरण चांगलेच गाजले होते त्या प्रकरणातील काही आरोपींची मोक्का कायद्याच्या अंतर्गत  सुटका करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती.


काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांच्यासमवेत कोठेवाडी च्या प्रकार संदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे ,यांच्यासह कोठेवाडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गोऱ्हे  म्हणाल्या, कोठेवाडी येथील घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे, मात्र मोक्का अंतर्गत कारवाई मध्ये काही आरोपींना सोडण्यात आलेले आहे. मात्र सगळेच आरोपींचा त्यामध्ये समावेश नाही, असे  सांगून मोक्का कायद्यामध्ये काही बदल झालेले आहेत त्या बदलाच्या आधारे त्यांची मोक्या कायद्याअंतर्गत सुटका झाली असली तरी त्याला आव्हान देण्यासाठी सरकारने आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


 गावामध्ये संरक्षण वाढवून द्यावे, कोठेवाडी गावात सीसी टीव्ही दुरुस्त करून द्यावे, त्याचबरोबर ग्रामरक्षक दल यामार्फत यांचा समन्वय करून द्यावा जेणेकरून त्यांना सातत्याने काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये पोलिसांकडे त्यांना त्या मांडता येतील, तसेच नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे कोठेवाडी येथे जाऊन तेथे पाहणी करतील तसेच गावांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त देण्याची मागणी केलेली आहे तो बंदोबस्त सुद्धा तेथे दिला जाईल तशा सूचना अधीक्षकांना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, तेथील महिला भगिनींनी शस्त्र परवान्यांची मागणी केली आणि त्याच्या  संदर्भात गृहमंत्र्यांनी मागतील त्याला शस्त्र परवाने योग्य नियमांत बसत असतील त्यांना द्या असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे यांनी  पोलीस अधीक्षक पाटील यांना दिले असल्याचे त्यांनी  सांगितले आहे.


 मला वाटतं महिला अत्याचाराच्या प्रश्नावर  गावकऱ्यांनी शस्त्रांची मागणी केल्यावर त्यांना शस्त्र नियमाच्या नुसार योग्य असेल ते करा असा ऐतिहासिक निर्णय गृहमंत्री पाटील यांनी दिला, आणि भगिनी हाक मारली,  राखी पौर्णिमा  पेक्षा एक वेगळ्या प्रकारची भेट शासनाने दिली आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,दिलीप वळसे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानते असे गोरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only