Sunday, August 15, 2021

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणकोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

संकटाच्या काळातही विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न

जिल्ह्यात आजपासून ई-पीक पाहणी प्रकल्पास सुरुवात

अहमदनगर: कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाटी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.


 


स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोड पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


 


यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,  स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. अशावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण ठेवले पाहिजे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही अनेक आव्हानांचा सामना करत आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांचे योगदान राहिले. विविध क्षेत्रात आपल्या देशाने गगनभरारी घेतली. जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपली नव्याने ओळख प्रस्थापित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


 


सध्या कोरोनाचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा आपण सामना केला. आता तिस-या लाटेचे संकट समोर आहे. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.


 


कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिली कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित केली. सध्या चाचण्यांची संख्या प्रतिदिन १५ हजाराहून अधिक वाढविली आहे. एकूण २३ लाखाहून  अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने १४ पीएसए प्लान्ट आपण उभारत असून त्यातील काही सुरुही झाले आहेत. संभाव्य तिस-या लाटेत आवश्यक ऑक्सीजन व्यवस्था आपण उभी करीत आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने १०० कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून ५० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी नमूद केले.  लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत १३ लाख ७२ हजाराहून अधिक डोसेस आपण दिले आहेत. लशीचा अधिक साठा उपलब्ध व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.  


 


पालकमंत्री म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महानगरपालिका यंत्रणांनी  या कालावधीत अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था, संघटना यांनीही याकामी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कोरोनाचे संकट असतानाही  जिल्ह्याचा विकास कामांकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतक-यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रयत बाजार सुरु करण्यात येत आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यासाठी ११ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती यातील लाभार्थींना अनुदानाचे वितरण आपण केले आहे. कृषी सिंचन योजने अंतर्गत  आतापर्यंत ६१ हजाराहून अधिक शेतकर्‍यांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा लाभ आपण दि

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only