Monday, August 30, 2021

दातीर खून प्रकरण: फरार मोरेच्या शोधासाठी पथके रवाना

 

दातीर खून प्रकरण: फरार मोरेच्या शोधासाठी पथके रवाना

नगर दिनांक 31 प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील दातीर खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हु मोरे हा दोन दिवसापूर्वी नगरच्या जिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याप्रकरणी दोन दिवसापासून तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक त्याचा शोध घेत आहे. अद्याप पर्यंत तो मिळून आला नाही .


राहुरी तालुक्यामध्ये दातीर यांचा खून करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून या गुन्ह्यामध्ये चार जणांना अटक केलेली होती. यातला मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी  मोरे याला सुद्धा मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले होते.


आरोपी मोरे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याचा कोरोना  अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. शनिवारी दुपारी चार वाजता तो शासकीय रुग्णालयातून फरार झालेला होता. या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी तैनात असताना देखील तो फरार कसा झाला, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आरोपी मोरे याचा छडा लावण्यासाठी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली आहेत. नेवासा राहुरी यासह विविध ठिकाणी हे पथके आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच आरोपी हा त्याच्या मुलाबरोबर पळून गेला असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only