Sunday, August 15, 2021

51 गुन्हे करणारे चौघे सराईत अखेर जेरबंद

 

51 गुन्हे करणारे चौघे सराईत अखेर जेरबंद

नगर दि 15 प्रतिनिधी-चोऱ्या, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न व खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या व पेट्रोल पंपावर दरोडे घालणारी चार  सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली आहे. या गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. या घटनेत 4 आरोपींना अटक केली आहे.त्याच्या कब्जातुन १ लाख ८०हजार- रु. किं. च्या तीन मोटार सायकल हस्तगत केले आहे.


आरोपी मध्ये  कृष्णा विलास भोसले, ( वय २२ वर्षे, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, बीड, ), सुरेश पुंजाराम काळे, (वय- ३८ वर्षे, रा. सोनवीर, ता. शेवगाव, जि. अ.नगर),  रावसाहेब विलास भोसले, (वय- ४० वर्षे, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड), अजिनाथ विलास भोसले, (वय- २५ वर्षे, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे.

याबाबतची माहिती अशी की, दिनांक 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 च्या सुमारास फिर्यादी अक्षय कुंडलीक गोल्हार, (वय - ३० वर्षे, रा. कोहीनूर मंगल कार्यालयासमोर, सावेडी, नगर) यांचे मालकीचे नगर-सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात ७ ते ८ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करुन व पिस्टलचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २,५५,८००/-रु. रकमेचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. या घटनेबाबत नगर तालूका  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.


तसेच दि. ११ रोजीचे पहाटे . 3 चे सुमारास फिर्यादी जयवंत शिवाजी फाळके,( वय ३८ वर्षे, रा. कर्जत, ता. कर्जत, जि. नगर) यांचे मालकीचे नगर-सोलापूर रोडवरील थेरगाव फाटा येथील फाळके पाटील अॅण्ड सन्स या भारत पेट्रोल पंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपावरील कर्मचान्यांना मारहाण करुन ९९,५००/- रु. रोख रक्कम व २४,००० /- रु. कि. चे चार मोबाईल असा एकूण १,२३,५००/-रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. 

हा गुन्हा करणारे आरोपी हे त्यांचे गावी हातवळण, ता. आष्टी येथे आलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ हातवळण येथे जावून सापळा लावून व पाठलाग करुन आरोपी कृष्णा भोसलेला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. . पेट्रोल पंप दरोडे त्यांने व इतर तिन साथीदारानी मिळून केले असल्याची माहिती दिल्याने या आरोपीतांचा शोध घेतला. व ताब्यात घेतलेल्या वरील नमुद चार आरोपी कडून सदरचे गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या १,८०,०००/-रु. किं. च्या बिना नंबरच्या तीन होंडा शाईन मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या असून आरोपींना मुद्देमालासह नगर तालूका पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही नगर तालूका पो.स्टे. करीत आहेत. या कारवाई दरम्याण आरोपी सुरेश पुंजाराम काळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे विरुध्द यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता सदर आरोपी शेवगाव पो.स्टे. गुरनं. [५५/२०२०, भादविक ३०२, ४५२, ३७ या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे.


ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, सुनिल चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, दत्तात्रय हिगडे, मनोहर गोसावी, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, रविन्द्र घुंगासे, प्रकाश वाघ, रोहीत येमूल, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, विजय धनेघर, चालक उमाकांत गावडे, बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली


चौकट

तेरा वर्षांपासून गुन्हे

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पकडलेल्या या चारही आरोपींवर 2008 सालापासून विविध गुन्हे दाखल होते अनेक गुन्ह्यांमध्ये ते फरार पण होते आरोपी कृष्णा भोसले याच्याविरुद्ध नऊ गुन्हे, दुसरा आरोपी आजिनाथ भोसले याच्याविरुद्ध पंधरा गुन्हे दाखल आहेत तर रावसाहेब भोसले या आरोपींवरुद्ध सर्वाधिक 21 गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी सुरेश काळे याच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत


चौकट

आणखी तिघांचा शोध सुरू

पकडलेल्या 4 आरोपींनी या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये खून दरोडा चोरी लुटमारी यासह विविध प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे तसेच या घटनेमध्ये त्यांचे अन्य तीन साक्षीदार असून त्याचाही पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only