Tuesday, August 3, 2021

सीआयडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता


सीआयडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता

। प्रतिनिधी नगर - ताडी विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी हे त्याला लघुशंकेसाठी घेऊन जात असताना ट्रेलरखाली सापडून जनार्दन चंद्रय बंडीवार ( वय ४६ रा. राहता, जि. अहमदनगर) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर-मनमाड रस्त्यावरील बाभळेश्वर बसस्थानकाजवळ दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारस घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी हा राज्य उत्पादन शुल्कच्या ताब्यात असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे बंडीवार याचा मृत्यू नेमका मृत्यू कशामुळे झाला याची सत्यता पुढे येण्यासाठी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.


या बाबत सविस्तर असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारूबंदी कायद्यांतर्गत ताडीच्या गुन्ह्यात जनार्दन बंडीवार व अखिल बुढन शेख या दोघांना अटक केली होती. सध्या अवैधरीत्या ताडी विक्री केली जात आहे. विषारी पदार्थ टाकून ही दारूविक्री केली जात असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यावर बाभळेश्वर कार्यालयातील कर्मचारी हे आरोपींना घेऊन जात असताना बंडीवार याला लघुशंकेसाठी बाभळेश्वर येथील बसस्थानकात घेऊन गेले. त्यानंतर त्याला पुन्हा गाडीमध्ये बसविण्यसाठी जात असताना एका ट्रेलरची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. भर दिवसा झालेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच राज्य उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक. गणेश पाटील, उपअधीक्षक एन. बी. शेंडे, संजय सातव, संदीप मिटके, सपोनि समाधान पाटील, नायब तहसीलदार रधे यांनी ना घटनास्थळी धाव घेतली. मयत आरोपी बंडीवार याच्या मृतदेहावर स शवविच्छेदन करण्यासाठी पुणे येथील बीजे मेडीकल येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान घटनेप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यक ग उपनिरीक्षक नंद परते यांच्या फिर्यादीवरुन लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा ने दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only