Thursday, August 12, 2021

वाकोडी फाट्यावर रस्ता खोदल्यामुळे वाद; महामार्गावर ग्रामस्थांचा रास्तारोको

 

वाकोडी फाट्यावर रस्ता खोदल्यामुळे वाद; महामार्गावर ग्रामस्थांचा रास्तारोकोनगर दि 12 प्रतिनिधी 


वाळकी ते भिंगार या जुन्या रस्त्यावर वाकोडी फाट्यावर मोजणी व हद्द निश्चितीला दरेवाडी ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर देखील सुद्धा भाजप प्रणित काही पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अचानकपणे भिंगार गावाकडे जाणारा रस्ता खोदून ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले .दरम्यान कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


नगर सोलापूर महामार्गावर वाकोडी फाटा या ठिकाणी भिंगारकडे जाणारा रस्ता आहे. सदर रस्त्यावर मोजणी करण्यात आलेली होती. मोजणी झाल्यानंतर दरेवाडी ग्रामस्थांच्या काहीजणांनी एकत्रपणे येऊन जी काही मोजणी झालेली आहे, त्यावर आज येथील तहसील कार्यालयामध्ये जाऊन आक्षेप घेतलेला होता. या रस्त्यावर अनेक कुटुंब राहत आहेत. आज भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी घेऊन थेट हा रस्ता फोडल्यामुळे त्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. या प्रकरणावरून गावामध्ये चांगलाच वाद झाला होता. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर सदर रस्त्याची मोजणी झालेली असताना अनेकांनी त्यावर आक्षेप घेतलेले आहेत, पण हद्द निश्चित होण्याआधी रस्ता खोदण्याचा घाट का घातला? असा सवाल त्यांनी उपस्थित केल्यानंतर याच गावातील राहणारे भाजपने जगताप कुटुंब या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यात व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. एकमेकांवर धावून जाण्याचा सुद्धा प्रकार या ठिकाणी घडला. शिवसेनेच्या आशा निंबाळकर यांनी या ठिकाणी 'हम करे सो कायदा', अशी परिस्थिती निर्माण झालेले आहे, रहिवाशांनी या रस्त्याच्या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे, असे असताना भाजपाच्या काही नेत्यांना हाताशी धरून हा रस्ता खोदला गेला, असा आरोपही निंबाळकर यांनी यावेळी केला. जोपर्यंत खोदलेला रस्ता बुजवत नाही, तोपर्यंत आम्ही रास्ता रोको सुरू ठेवणार, असा इशारा देऊन नगर सोलापूर महामार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको झाल्यामुळे दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी आंदोलकांना बाजूला करत चर्चा केली. खोदाई केलेल्या रस्त्याची पाहणी ही त्यांनी केली.

राजेंद्र राहिंज, एकनाथ ससे, बद्रीनाथ बेरड यांनी याबाबत निवेदन देऊन आक्षेप घेतला आहे.


या वेळी बोलताना आशा निंबाळकर म्हणाल्या की, या ठिकाणी रस्सा परस्पर खोदला आहे, या मध्ये येथील जनतेला त्रास देण्याचा प्रकार घडला आहे, आक्षेप घेतला असताना परस्पर का खोदला याच जाब विचारला म्हणून याना राग आला आहे, पण जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only