Sunday, August 1, 2021

निवड चाचणी घेण्यात आल्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल नगर दिनांक 1 प्रतिनिधी 


शनिवार व रविवार या दोन दिवशी विकेंड लॉक डाउन असतानादेखील सुद्धा भाजपाच्या पदाधिकाऱ्याने बॉक्सिंग स्पर्धेच्या निमित्ताने निवड चाचणी घेण्याचा प्रकार आज नगर येथे झाला, तोफखाना पोलिसांनी या ठिकाणी जाऊन कारवाई करत तीन जणच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे.


नितीन शेलार ,लखन शिंदे, महेंद्र कुसाळकर सर्व राहणार सावेडी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.


शनिवार रविवार विकेंड लॉक डाऊन आहे तसेच करण्याच सरकारने घालून दिले आहेत या नियमांचे उल्लंघन होता कामा नये याची खबरदारी घेण्याचे आली सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले होते आज सावेडी परिसरात असलेल्या हुंडेकरी शोरूम च्या मागे बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा बोलविण्यात आलेली होती, या ठिकाणी 50 ते 60 जण हे जमा झालेले होते व याठिकाणी पंच सुद्धा आलेले होते, याची माहित तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक गेल्यानंतर या ठिकाणी त्यांना हे लोक जमा झाला असल्याचे दिसून आले.


तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only