Tuesday, August 31, 2021

नगरमधील पुरासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली तक्रार

 

नगर , 31 नगर शहरातील काही घरे व दुकानांत पुराचे पाणी पोचले. या सर्व प्रकाराला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व नगर महापालिका जबाबदार आहेत. नगर शहरात ओढे, नाले व नदी पात्र बांधकाम करण्याला महापालिकेने परवानग्या दिल्या आहे. पूर नियंत्रण रेषेतील जमिनीत परवानग्या देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरीकृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. 


 नगर शहर व जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्व ओढे, नाले व नद्या दुधडी भरून वाहत आहेत. यातच शहरातील ओढे, नाले व नदी पात्रांत झालेल्या अतिक्रमणांमुळे शहरातील काही भागांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. 


सीना नदीवरील कल्याण रस्ता परिसरातील पूल व काटवन खंडोबा रस्ता पुलावरून पाणी वाहत आहे. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला. जेऊर गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाचे पाणी दुकाने, घरे, कार्यालयांत शिरले. त्यामुळे मोठी आर्थिक हाणीही झाली आहे. हे पावसाचे पाणी सीना नदीतून वाहत आहे. सीना नदीला पूर आल्यामुळे नगर-कल्याण रस्त्यावरील वाहतूक शहर बाह्यवळण रस्त्यावरून वळविण्यात आली होती.
नगर शहरातील काही घरे व दुकानांत पुराचे पाणी पोचले. या सर्व प्रकाराला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व नगर महापालिका जबाबदार आहेत. नगर शहरात ओढे, नाले व नदी पात्र बांधकाम करण्याला महापालिकेने परवानग्या दिल्या आहे. पूर नियंत्रण रेषेतील जमिनीत परवानग्या देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरीकृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. 


या पत्रात म्हटले आहे की, अनगर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाची कामे केलेली नाहीत. दर वर्षी 15मे पर्यंत ओढे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्याची काळजी घेतली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त महापालिका आयुक्त यांना पत्र देण्यात धन्यता मानली जाते. अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर बांधकामांना मुकसंमती दिली जाते.
नगर शहरातील पूर परिस्थिती निर्माण झाली यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणारे वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकारी व सेवक जबाबदार आहेत. यात जिल्हाधिकारी प्रथम जबाबदार आहेत. मागील 2 वर्षांपासून ओढे-नाल्यांची पहाणी तपासणी करून आम्ही आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी माहिती दिला आहे. तरी इतकी गंभीर बाबी वर काम न करता फक्त महापालिका आयुक्तांना एक पत्र देण्याशिवाय कोणतेही काम केले नाही. शहर व जिल्ह्यातील पूर स्थितीला आपत्ती व्यवस्थापन संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे गुन्हे दाखल होण्या इतपतच पुरावेही मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे वेळोवेळी सादर केले आहेत. आता या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सेवकांना निदोर्ष सोडल्यास जनतेला चुकीचा संदेश जाईल.


आपणच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे राज्याचे अध्यक्ष आहात. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे 15 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतलेली नाही. आम्ही आठवण करून दिल्यावर बैठक घेऊन सारवासारव केली. या सगळ्या बाबी गंभीरपणे दखल घेण्या लायक आहेत, असे म्हणत चंगेडे यांनी कारवाईची मागणी केली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only