Sunday, August 1, 2021

बिगबाजारला झाला दंड, महापालिका पथकाची ची कारवाई

 

नगर दिनांक 1 प्रतिनिधी


 नगर शहरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या बिगबाजार हे शोरूम सर्रासपणे उघडे असल्याचे महानगर पालिकेच्या पथकाला लक्षात आल्यानंतर आज दक्षता पथकाचे प्रमुख शशिकांत नजर यांच्या अधिपत्याखाली बिग बाजार या शॉप वर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


शासनाच्या नियमानुसार जे काही लॉक डाऊन चे नियम लावून दिलेले आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते. नगर शहरातील मनमाड महामार्ग असलेले बिग बाजार हे शनिवार, रविवार दोन दिवस सुरू होते. आज रविवार असल्यामुळे गर्दी सध्या मोठ्या प्रमाणात होती, महानगरपालिकेच्या दक्षता पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेचे दक्षता पथक तात्काळ बिग बाजार या ठिकाणी पोहोचले या ठिकाणी अनेक जण मालक खरेदी करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात संदर्भामध्ये या मॉल चे व्यवस्थापन यांनी याठिकाणी आम्ही मालक विक्री करतो असे सांगितले वास्तविक पाहता बंदच्या काळामध्ये अस्थापना सुरू ठेवू नका असे आदेश असताना आपण त्यात काय चालू ठेवल्या असच जागा सुद्धा या पथकाने विचारला त्यानंतर पथकान.25000 दंडात्मक कारवाई यावेळी केली. तर पाईपलाईन रोड या ठिकाणी अमोल नावाने जे स्टोअर होते ते सुद्धा सुरू असल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहेसदरची कारवाई शशिकांत नजन  दक्षता विभागाचे प्रमुख,  अमोल लहारे, भास्कर आकु बत्तीन,अनिल आढाव,राहुल साबळे,अजय कांबळे,राहुल शेंडे,बबन काळे,राजू जाधव,बबन काळे,ऋषिकेश लखlपती,मांज्याबापू लहारे, परशुराम नागपुरे,कोलते, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे


या संदर्भामध्ये दक्षता पथकाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी आम्ही शहरांमध्ये विविध प्रकारच्या कारवाया करत असतो गेल्या आठवडाभर मध्ये अनेक ठिकाणी आम्ही कारवाई केलेल्या होत्या, आज बिग बजार हा मॉल शनिवार, रविवार सुद्धा सुरू होता त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याचे सांगितले.


  1. महानगर प्रशासन ने जी आर मध्ये बरोबर वर्णन केले नाही काय बंद काय चालू ...त्यामुळे असे प्रकार आहे।

    ReplyDelete

Whatsapp Button works on Mobile Device only