Sunday, August 1, 2021

नगर शहरापासून काही अंतरावर बिबट्या आढळल्याने खळबळनगर दिनांक 2 


  वरूळाच्या मारुती परिसरातील बिबट्या ची सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप निघाली  राहुरी परिसरातील

सोशल मीडियाचा वापर जवाबदारीने करण्याचे आवाहन


नगर मधील नालेगाव परिसरातील वरूळाच्या मारुती  परिसरात रविवारी सायंकाळी बिबट्या दिसल्या बाबत एक व्हिडीओ क्लिप  सोमवारी सोशल मीडियावर वेगात पसरली यामुळे भीतीपोटी  शहरात  चर्चाना उधाण आले. या भागातील नागरिकांनी सकाळी या बाबत व्याघ्र संरक्षण समिती सदस्य  मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी या बाबत वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे  यांना माहिती दिली. मात्र या क्लिप च्या सत्यतेबाबत त्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. हि क्लिप देवळाली प्रवरा ता राहुरी या  परिसरातील मुसमाडे वस्तीवरील असल्याचे साबळे यांचे सावेडीतील सहकारी अभिजित सरनोबत  यांना  समजले त्यांनी तातडीने  साबळे यांना या बाबत  कळवले. साबळे यांनी  शेत मालक विशाल मुसमाडे पाटील  यांच्याशी संपर्क साधून या बाबत खात्री केली. त्यांनी व वस्तीवरील काही जणांनी सायंकाळी व रात्री असे व्हिडीओ चित्रित केल्याचे या मुळे स्पष्ट झाले . हि क्लिप वारुळाच्या मारुती परिसरातील असल्याचे कोणीतरी मुद्दाम चुकीचे  व्हायरल केले आहे.  वारुळाच्या मारुती परिसरातही लांडे थळ येथेही गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर असल्याचे साबळे यांनी सांगितले. या भागात ऊस शेती मोठ्याप्रमाणावर असल्याने इथे बऱ्याचदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. इथे बिबट्याचे वास्तव्य आहे मात्र त्याने आत्तापर्यंत कुणावरही हल्ला केलेला नाही.  सोमवारी दुपारी पाहणीसाठी  या ठिकाणी  वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्याचे थेटे यांनी सांगितले. कोणीही खात्री असल्याशिवाय बिबट्याबाबत  सोशल मीडियावर अफवा पसरवू नये त्यामुळे विनाकारण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरते असे आवाहन थेटे  व साबळे यांनी नागरिकांना केले आहे.लांडे थळ येथे आवश्यकता वाटल्यास नागपूर वरून परवानगी घेऊन पिंजरा लावण्यात येईल.या भागातील बिबट्या दिसल्याची क्लिपही

साबळे याना मिळाली आहे.    


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only