Tuesday, August 3, 2021

स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी गजाआड; नगर तालुका पोलिस व एलसीबीची संयुक्त कारवाई


 स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी गजाआड; नगर तालुका पोलिस व एलसीबीची संयुक्त कारवाई


नगर : प्रतिनिधी

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणार्या पाच जणांच्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. नगर तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.3) ही कारवाई केली. त्यांच्या आणखी साथीदारांचा शोध सुरु आहे, असे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.


रामदास चंदर भोसले (रा.घोसपुरी, ता. जि. अहमदनगर), परमेश्वर रविकांत काळे (रा.घोसपुरी, ता.जि. अहमदनगर), शिवदास रामदास भोसले (रा.घोसपुरी ता. जि. अहमदनगर), प्रतिक रामदास भोसले (रा.घोसपुरी ता जि.अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.


मिलिंद कान्हाजी काशिद (जि.चंद्रपुर, सध्या रा. औरंगाबाद) या व्यक्तीला २० जुलै २०२१ रोजी नगर तालुक्यातील सारोळा कासार या गावामध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून अज्ञात दरोडेखोरांनी ७ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला होता. नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा सुरु असताना मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोसई

गणेश इंगळे स्थानिक गुन्हे शाखा, पो.स.ई धनराज जारवाल नगर तालुका पोलीस ठाणे अशी चार वेगवेगळी पथके तयार करुन या गुन्ह्यातील 4 आरोपी व एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only