Sunday, August 15, 2021

नगर शहरासह जिल्ह्यात लसीकरण खेळ खंडोबा-पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, जिल्हाधिकारी करणार तपासणी नगर शहरासह जिल्ह्यात लसीकरण खेळ खंडोबा-पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, जिल्हाधिकारी करणार तपासणी

नगर दि 15 प्रतिनिधी 


नगर जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा खेळखंडोबा होत आहे व ही बाब गंभीर आहे, जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ या संदर्भामध्ये तपासणी करावी, असे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिले, तिसऱ्या करोना लाटे  संदर्भात प्रशासनाची तयारी पूर्णत्वाला गेली आहे ,तिसरी लाट उंबरठ्यावर आहे, त्यामुळे विशेष दखल घेतली पाहिजे असे सांगून नगर जिल्ह्यामध्ये 400 मे. टन ऑक्सिजन होईल अशी तयारी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे आदी यावेळी उपस्थित होते.


नगर जिल्ह्यामध्ये लसीकरण झालेले आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत व या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यावर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्यामध्ये जर लसीकरणाच्या बाबत सावळागोंधळ होत असेल व हा मुद्दा गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असेल तर ही चिंतेची बाब आहे. मागच्या वेळेला किती व्हायल आल्या व किती लस देण्यात आल्या होत्या, याची माहिती देण्यास सांगितले असताना देखील ती दिली जात नाही, ती तात्काळ देण्यात यावी असे सांगून ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये लस येत आहे, त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करा जर कोणाची तक्रार आली तर निश्चितपणे संबंधितांवर कडक कारवाई करू, असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. आज नगर जिल्ह्यामध्ये 26 टक्के लसीकरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले वास्तविक पाहता रुग्ण संख्या वाढत चालल्यामुळे आपल्याकडे लसीकरण सुद्धा वाढवले पाहिजे, याबाबत मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोललेलो आहे पण ज्या वेळेला सुरुवातीला लस पुरवठा झाला त्यावेळी लस घेण्यामध्ये अनेक तर्कवितर्क होते त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण व्यवस्थित झालेला नाही, मात्र, त्यानुसार सध्या लस पुरवठा होतो, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे आता जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत व केंद्राने सुद्धा कोटा उपलब्ध करून द्यावा असे ते म्हणाले. नगर शहरामध्ये आतापर्यंत 24 हजार 270 वायल तर जिल्ह्यामध्ये एक लाख तीन हजार 774 वायल प्राप्त झाले असल्याच

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96 पॉईंट चार टक्के एवढे आहे आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये तीन लाख 68 हजार जणांना कोरोना लागण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तिसरा लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्हा भरांमध्ये चौदा तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारणी करण्यात आलेली आहे जिल्हा नियोजनातून 143 कोटी रुपयांचा निधी सुद्धा या महामारी च्या काळातील वैद्यकीय सुविधा साठी उपलब्ध करून दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी परवानगी दिलेली आहे मात्र जोपर्यंत 70% लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीच लागेल असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


आवर्तने सोडणार

नगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाऊस कमी आहे हे ही वस्तुस्थिती आहे, राज्यामध्ये नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची टक्केवारी ही कमी आहे याठिकाणी दुष्काळ जाहीर करावा अशी अनेकांनी मागणी केली आहे. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही नियम व अटी आहेत त्या अनुषंगाने विषय हाताळावा अशा सूचनाही त्यांना दिल्या असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. हवामान खात्याने पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस मुबलक पडेल असे सांगितले आहे जर तसे झाले तर दुष्काळाची परिस्थिती राहणार नाही जर पाऊस पडला नाही तर आपल्याला दुष्काळ जाहीर करण्यास संदर्भामध्ये कॅबिनेटसमोर हा विषय मांडावा लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच नगर जिल्ह्यामध्ये मुळा व गोदावरी नदीतून आवर्तन सोडण्याचा विषय हा मार्गी लागलेला आहे राज्याचे मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत काल बोलणे झाले असून लवकरच दोन्ही नद्यातून कालव्यात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही मुश्रीफ नी यावेळी सांगितले.


चौकट

शिर्डी विशवस्त विषय टाळला


शिर्डी याठिकाणी स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्यासाठी आपल्याला उच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज आहे त्या संदर्भात पाठपुरावा केला होता मात्र अजूनही मार्ग निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे, संस्थांनवर विषवस्त मंडळ नेमण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत असे ते म्हणाले. त्यावर, दुसरीकडे शिर्डी संस्थानच्या नवीन संचालकांची नियुक्ती सरकार केव्हा करणार असे मुश्रीफ यांना व

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only