Thursday, August 19, 2021

मोहरमच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

 


नगर दिनांक 19 प्रतिनिधी

 मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने  तोफखाना हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्याची  तयारी सुरू केली आहे .आज तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी बंदोबस्त बाबतच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या.


यावेळी पोलिस विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल दुमे,  तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, आदींसह अधिकार यावेळी उपस्थित होते.


सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. नगर शहरामध्ये मोहरम उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, करोनाच्या नियमांमुळे शहरांमध्ये मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे फक्त कोठला परिसरामध्ये प्रथेप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले जातील असे जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


तोफखाना परिसरामध्ये तसेच कोठला परिसरामध्ये बंदोबस्त कशाप्रकारे तैनात करण्याचा यासाठी आज सकाळी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश यावेळी दिले, तसेच कुठल्या परिसरामध्ये कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा व कोणाची नेमणूक कोठे करायची याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


यावेळी बंदोबस्तामध्ये 4 डी वाय एस पी ,चार पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोनशे पोलीस कर्मचारी, 2 दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only