Monday, August 23, 2021

मोटरसायकल चोरणारी टोळी पकडली; स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

 मोटरसायकल चोरणारी टोळी पकडली; स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाईनगर दि 23 प्रतिनिधी


नगर शहरातून मोटार सायकली चोरणारी सराईत टोळी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली असून सहा मोटार सायकलीसह 4 जणांना जेरबंद केले आहे, अशी माहिती विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.


आरोपीमध्ये दिलीप दत्तात्रय शिंदे, (वय- २६ वर्षे, रा. गोंधळे मळा, नागरदेवळे, ता. नगर), प्रफुल्ल गजानन गांगेकर, (वय ३० वर्षे, रा. गाँवळे मळा, नागरदेवळा, ता. नगर), खालील बालम शेख, (वय ४५ वर्षे, रा. नागरदेवळा, ता. नगर), अमजद हुसेन शेख, (वय- ४५ वर्षे, रा. मोमीनपुरा, भिंगार) यांना ताब्यात घेतले. तसेच आरोपी अवतार जहूर अहमद शेख, रा. गवळीवाडा, भिंगार याचा आरोपीमध्ये समावेश आहे.


नगर शहरासह जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक गुन्हे घडले आहे. चोरीचे गुन्हे दाखल असल्यामुळे अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असल्याचे बोलले जात आहे. शहरातील दुचाकी चोरीचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने गेल्या तीन दिवसापासून आरोपींचा शोध सुरू केलेला होता. नगर तालुक्यामध्ये आरोपी असल्याची माहिती मिळाली होती.


 गणेश सोहनलाल गुलाटी, (वय २२ वर्षे, रा. इंदीरा कॉलनी, तारकपूर) हे त्यांचे मालकीची बजाज पल्सर मोटार सायकल (नं. एमएच-१६ सीपी-२६११) ही त्यांचे घरासमोर पाकींग करुन घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल चोरुन नेली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

 

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून तपास करीत असताना पोलिस निरीक्षक  अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली की,  गुन्हा हा दिलीप शिंदे (रा. नागरदेवळे, ता. नगर) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने  नागरदेवळे येथे जावून माहिती घेतली. आरोपीचा शोध घेवून आरोपी दिलीप दत्तात्रय शिंदे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार प्रफुल्ल गांगेकर असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर आरोपीचा शोध घेवून आरोपी प्रफुल्ल गजानन गांगेकर यास ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेली ९०,००० रु. किं. ची काळे रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली.


आरोपींना विश्वासात घेवून नगर शहरामधून आणखी किती मोटार सायकली व कोठून चोरलेल्या आहेत, याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी नगर शहरातून रेल्वे स्टेशन पाकींग, गुलमोहोर रोड, नेता सुभाष चौक, गोविंदपुरा व सिव्हील हॉस्पिटल येथून मोटार सायकली चोरलेल्या असून त्यापैकी तीन मोटार सायकली ह्या भिंगार व नागदेवळा येथे विकल्या असून दोन मोटार सायकली आमच्याकडे असल्याचे सांगीतल्याने सदर माहितीचे आधारे आरोपी खालील बालम शेख (वय ४५ वर्षे, रा. नागरदेवळा, ता. नगर), अमजद हुसेन शेख, (वय- ४५ वर्षे, रा. मोमीनपुरा, भिंगार) यांना ताब्यात घेतले. तसेच आरोपी अवतार जहूर अहमद शेख, रा. गवळीवाडा, भिंगार याचा शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून  मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.


 गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या अधिपत्याखाली पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, पोहेकॉसंदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाचरुट, योगेश सातपुते व  संभाजी कोतकर अशांनी मिळून ही कारवाई केली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only