Sunday, August 15, 2021

मोहरम ची स्थापना पोलीस दलाकडून चादर अर्पण


नगर दिनांक 15 प्रतिनिधी


 कोरोनाच्या काळामध्ये सण साधेपणाने साजरी करा असे आदेश दिले आहे. आज नगर शहरामध्ये प्रथेप्रमाणे मोहरम च्या पार्श्वभूमीवर मोहरम च्या पाचव्या दिवशी प्रथे प्रमाणे सवारी संध्याकाळची नमाज  पठण करून सवारी ची स्थापना करण्यात आली यावेळी मुजावर यांच्या उपस्थितीमध्ये या सवारी ची स्थापना मोठ्या उत्साहात मध्ये करण्यात आली दरम्यान या संदर्भामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.


गेल्या दोन वर्षांपासून सण उत्सव साजरे करताना विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आलेले आहे सध्या शाळा धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आलेले आहेत सण उत्सव साजरे करताना सरकारने काही अटी व नियम घालून दिलेल्या आहे आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.


देशभरामध्ये मोहरम उत्सव साजरा करण्यात येतो नगर जिल्ह्यामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे शहरातील कुठला  परिसरामध्ये उत्सव साजरा करताना या ठिकाणी सवारी स्थापन करण्यात येते आज मोहरम उत्सवाच्या पाचव्या दिवशी छोटे बारा इमाम व मोठे बारा इमाम यांच्या सवारी ची स्थापना पारंपरिक पद्धतीने आज सायंकाळी करण्यात आले या परिसरामध्ये असणारे नागरिक हे दर्शनासाठी याठिकाणी घराच्या गच्चीवर थांबून या हुसेन ची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.


कोठला परिसरामध्ये आज मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्‍योती गडकरी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे,  सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, पोलीस उपनिरीक्षक तथा गुन्हे प्रगतिकरण विभागाचे प्रमुख सुरज मेढे, , यांच्यासह दंगल नियंत्रण पथक ,तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only