Tuesday, August 31, 2021

खुन्यातील गुन्ह्यातील आरोपी चा काही तासातच नगर तालुका पोलिसांनी लावला छडा ,आरोपीला अटक

 खुन्यातील गुन्ह्यातील आरोपी चा काही तासातच नगर तालुका पोलिसांनी लावला छडा ,आरोपीला अटकनगर दि 31 प्रतिनिधी


केडगाव अरणगाव बायपास रोड रेल्वे ब्रिज जवळ ड्रायव्हरचा खुन करणारा आरोपीचा नगर तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे .


आरोपी मध्ये मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे, राहणार रा. कायनेटिक चौक नगर याचा समावेश आहे.दि. २५ ऑगस्ट रोजी  केडगाव अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आले होते. सदर मयताचे शवविच्छेदन केले असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने टणक हत्याराने पाठीत मारलेमुळे व फुप्फुसास सुज आल्याने तो मरण पावला .


सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेचा शोध लावण्याचे आदेश दिले होते, ग्रामीण विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त कले होते.


घडलेल्या घटनेनंतर नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.न. ४७५/२०२१ भादवि क.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी संबंधित मयत झालेला इसम याची एक दिवसांमध्ये ओळख पटवून त्याचा नातेवाईकांच्या माध्यमातून विविध माहिती पोलिसांनी हस्तगत केली होती.


 या घटनेमध्ये आरोपी मिनींनाथ  व विकास यांचे मैत्रीचे संबंध होते हे दोघेजण एका खाजगी ठिकाणी चालक म्हणून कामाला होते, या दोघांमध्ये अंतर्गत वाद झाल्यामुळे  विकास याला लाकडी दांड्याने मारहाण केली होती, या मारहाणीमध्ये विकासाचा मृत्यू झालेला होता. मारहाणं इतकी जबर करण्यात आली होती की विकास याचा चेहरा 

दिसून येत नव्हता सदर मयताची ओळख पटविणेकामी सर्व जिल्ह्यामधे तसेच नजीकच्या जिल्ह्यामधे संदेश देण्यात आलेला होता. तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सदर मयत व्यक्तीची ओळख पटवली गेली.


 सदर मयताचे नाव विकास महादेव कदम वय 40 वर्षे सध्या रा. वैष्णवी नगर केडगाव अहमदनगर असे आहे. गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा खुण करणारा आरोपी हा त्याचे मयत) सोबत ड्रायव्हींगचे काम करणारा मिनीनाथ मच्छींद्र अडसरे मुळ रा. कायनेटीक चौक नगर सध्या रा. अरणगाव ता. जि. नगर हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयाने दिनांक 02 सप्टेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


सदरची कारवाई . पोलीस अधिक्षक  मनोज पाटील . अपर पोलीस अधिक्षक . सौरभ कुमार अग्रवाल. उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सफो पठाण, पोहेकॉ रमेश गांगर्डे, रावसाहेब खेडकर, पोना सोनवणे, धर्मराज दहिफळे, रवि सोनटक्के पोकॉ ज्ञानेश्वर खिळे, प्रशांत राठोड, जयदत्त बांगर चालक सफी घोरपडे यांनी केलेली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only