Wednesday, August 25, 2021

वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई

 


वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई

नगर दिनांक 25 प्रतिनिधी


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात  नगर येथे काल कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .नगरचे पोलीस या संदर्भात आता पुढील काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.


केंद्रीय मंत्री राणे यांना काल अटक होऊन त्याला जामीन मिळालेला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यामध्ये चार ठिकाणी वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये नगर येथे शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये येऊन या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार येथील कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये राणे यांच्यावरुद्ध कलम 500 ,505(2),153.B (1)(C) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


आज नाशिक पोलिसांनी राणे यांना नाशिक पोलीस ठाणे मध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते ,नगरमध्ये राणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .त्यामुळे आता नगरचे पोलीस या संदर्भामध्ये काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.


 या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only