Monday, August 30, 2021

नगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

 नगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या बदल्या आज सायंकाळी उशिराने करण्यात आलेल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या बदल्यांचे आदेश बजावले आहेत, बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहे.गेल्या पंधरा दिवसापासून पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या केव्हा होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली होती, गेल्या आठवडाभर मध्ये बदल्यांची यादी निश्चित करण्यात आलेली होती. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना कोणते पोलीस ठाणे द्यावे या बाबतचा निर्णय घेण्यात आला होता नगर येथील नियंत्रण कक्षामध्ये असलेले पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांचे राहता पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. आश्वि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांची नगरच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे बदली करण्यात आली आहे तर बाजीराव पवार यांची नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पदी बदली करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only