Tuesday, August 24, 2021

तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्याना स्थगिती

 
तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्याना स्थगितीनगर दि 24  प्रतिनिधी


 नगर जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांना स्टे मिळाला असून ते आता त्यांच्या  मूळ पदावर काम करणार आहेत अन्य दोन अधिकाऱ्यांच्या नगर जिल्हा बाहेर बदल्या झाल्या आहेत.


पोलीस निरीक्षकांच्या वरिष्ठ पातळीवरून बदल्या नुकत्याच झालेल्या होत्या. त्या बदलांना स्थगिती मिळण्यासाठी  तिघांनी प्रयत्न केले होते.


यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, शहर विभागाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचा समावेश असून त्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.


 नाशिक परिक्षेत्र विभागातून पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांची नगर येथे बदली करण्यात आली आहे. तर नगर जिल्हा बाहेर पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व विकास देवरे यांची बदली झाली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only