Tuesday, August 24, 2021

राणे यांच्याविरोधात नगर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल भाजप कार्यालय समोर राणेच्या प्रतिमेला जोडो मारून दहन केले

 
राणे यांच्याविरोधात नगर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल भाजप कार्यालय समोर राणेच्या प्रतिमेला जोडो मारून दहन केले

नगर दि. 24 प्रतिनिधी 


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सर्वत्र निषेध होत असतानाच आज नगर शहर कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नगरच्या भाजप कार्यालयासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमेचे दहन केले. नारायण राणेच करायचं काय खाली डोकं वर पाय, कोंबडी चोर नारायण राणे अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला.


यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, दीपक खेंरे,संतोष शिंदे,महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर, अरुणा गोयल, संजय शेंडगे, संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे,प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, गणेश कवडे,शाम नळकांडे, अभिषेक कळमकर, संतोष गेनाप्पा, किरण बोरुडे, सुरेश शिरसागर दत्ता जाधव, काका शेळके ,संग्राम कोतकर, विशाल वालकर, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.


भाजपाच्या  जन आशीर्वाद यात्रेमध्ये केंद्रीय उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सर्वत्र त्या वक्तव्यचा निषेध सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहे.  नारायण राणे यांच्यावर राज्यभरात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


आज राणे यांच्या विरोधामध्ये नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. 


दिलेल्या तक्रारी मध्ये आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राणे यांनी जे अपशब्द वापरले आहेत ते शोभा देणारे नाही, एक प्रकारे त्यांनी राज्याच्या जनतेचा अपमान केलेला आहे, तसेच शिवसेनेच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहेत. तसेच समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राणे यांनी केलेला आहे. तसेच त्यांनी संविधानाचा सुद्धा अवमान केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे. या संदर्भामध्ये राणे यांच्या विरुद्ध  येथील कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


यावेळी बोलताना माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे. राणे यांना शिवसेनेने मोठे केले आज ते सर्व काही विसरले आहे .राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरला. शिवसेना असे वक्तव्य कधीही सहन करणार नाही. त्यांना  नगरला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  आम्ही  निषेध केलेला आहे. भाजपाने नारायण राणे यांना पक्षात घेऊन मोठी चूक केली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


यावेळी बाळासाहेब बोराटे यांनी नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बेताल वक्तव्य सध्या ते करत आहेत. त्यामुळे आम्ही त्याचा सर्वत्र निषेध करत आहोत शिवसेना संपवण्यासाठी भाजपने नारायण राणे यांना पक्षात घेतले का? भाजप संपवण्यासाठी त्यांना घेतले असावे सवाल आता उपस्थित झाला आहे असे ते म्हणाले.


संभाजी कदम म्हणाले की, राणे शिवसेनेत होते म्हणून त्यांना भाजपने मंत्री केले. राणेचा आम्ही निषेध करत आहोत. आता भाजपला कळेल राणेला पक्षात घेऊन किती मोठी चूक केली आहे. राणे यांच्या विरोधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले.


चौक


केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात  शिवसैनिकांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. या राणेचे करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राणेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करत घोषणाबाजी केली.


चौकट


संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याला भाजप कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन केल्यानंतर या ठिकाणी राणे यांचा  फ्लेक्स शिवसैनिकांनी जाळला.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only