Thursday, August 26, 2021

तारकपूर परिसरातून सुगंधी तंबाखू जप्त; तोफखाना पोलिसांची कारवाई

 
तारकपूर परिसरातून सुगंधी तंबाखू जप्त; तोफखाना पोलिसांची कारवाई

नगर : तारकपूर परिसरात सिंधी कॉलनीमध्ये एका घरातून सुमारे 45 हजार रुपये किंमतीची विक्रीला बंदी असलेली सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि.25) सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणी पोकॉ शैलेश गोमसाळे यांच्या फिर्यादीवरुन राकेश तेजभान कंत्रोड (रा.सिंधी कॉलनी, तारकपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोहेकॉ शकील सय्यद, पोकॉ एस. एस. त्रिभुवन, ए. आर. आंधळे, मपोकॉ तांबे, शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष राकेश कंत्रोड याच्या घरासमोर छापा टाकला. त्याच्या घराची झडती घेतली असता दोन प्लास्टिकच्या गोण्या व एक पोते आढळून आले. यात 45 हजार रुपये किंमतीची सुगंधी तंबाखूची पाकिटे आढळून आली. पथकाने मुद्देमाल जप्त करत राकेश कंत्रोड याला ताब्यात घेऊन शरिरास अपायकारक, नशाकारक पदार्थाची विक्री करण्यासाठी मालाचा साठा केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली आहे. शैलेश गोमसाळे यांच्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी कलम 188,272, 273, 328 नुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only