Sunday, August 15, 2021

उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची झाली चोरी

 नगर दि16 प्रतिनिधी


 नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून या या ठिकाणी असणारे लोखंडी प्लेट सुमारे 25 हजार रुपयांचा माल चोरीला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे आहे.


गेल्या पाच महिन्यापासून नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे .शहराच्या मध्यवर्ती भागात मध्ये हॉटेल अशोका ते सक्कर चौक असा हा उड्डाणपूल होणार आहे. सदरचे काम काम प्रगती पथावर सध्या सुरू आहे. डी आर अग्रवाल यांच्या कंपनी ला काम दिले आहे त्याने या भागांमध्ये खांब उभारण्यात सुरू केले आहे.


उड्डाणपुलासाठी लागणारे साहित्य हे आजूबाजूच्या परिसरामध्ये ठेवण्यात आले होते, होटेल अशोका जवळ असलेले लोखंडी , सुमारे 64 मीटरच्या लांब, 32 हून अधिक प्लेट या काल रात्रीच्या सुमाराला चोरीला गेले आहे सदरची बाब संबंधित निदर्शनास आल्यानंतर त्यांना या ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आले. सदर प्लेटची रक्कम 25 हजार आहे. पोलिस ठाण्यांमध्ये डीआर अग्रवाल या कंपनीच्या वतीने सिक्युरिटी इन्चार्ज प्रदीप बडवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only