Friday, August 6, 2021

बनावट सोने तारण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होणारनगर दिनांक 6 प्रतिनिधी 


नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव येथील बनावट सोने प्रकरणाचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागकडे वर्ग केल्यानंतर सोमवारपासून या घटनेचा तपास व चौकशी सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात संदर्भामध्ये बँकेकडून अन्य काही कागदपत्रे सुद्धा पोलिसांना हस्तगत करायचे आहेत.


नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये गेल्या दोन वर्षापासून बनावट सोने प्रकरणाचा विषय गाजला होता. मागील आठवड्यामध्ये या प्रकरणा संदर्भमध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 160 जनांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


2018 साली बनावट सोनेतरणचा विषय तत्कालीन व्यवस्थापक शिंदे यांनी उघडकीस आणलेला होता. त्यांनी त्या वेळेला बँकला  पत्रही दिले होते. मात्र त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नव्हती. ज्या वेळेला बनावट सोनेतारण खाती लिलावेळी समोर आली व  गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने यासाठी पाठपुरावा सुद्धा केलेला होता.


367 पिशव्या या बनावट आढळून आल्यानंतर मागील आठवड्यामध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 160 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साधारणता यांची रक्कम पाच कोटी रुपयांच्या घरांमध्ये असल्यामुळे सदरचा गुन्हा नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सोमवारपासून या गुन्ह्याचा तपास सुरू करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.


या संदर्भामध्ये बँकेकडे असलेले रेकॉर्ड सुद्धा पोलिसांना हस्तगत करायचे आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये अन्य काहींच्या सहभाग असल्याचे सुद्धा पुढे आलेले आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलिसांना आता याचा तपास करावा लागणार आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only