Monday, August 2, 2021

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये 365 बनावट सोन्याच्या शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 159 खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला

 दिनांक 2 नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये 365 बनावट सोन्याच्या पिशव्या आढळून आल्या प्रकरणी आज अखेरीला शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 159 खातेदारासह  इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अर्बन बँक बचाव कृती समितीच्या पाठपुराव्याला एक प्रकारे यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.


अर्बन बँक बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले होते  त्यांना या प्रकरणी लक्ष देऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली होती त्यानुसार आज हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल बँकेच्या शेवगाव शाखेतील बहुचर्चित सोनेतारण घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 27 किलो 351 ग्रॅम सोनेतारण ठेवल्यालेल्या 367 पिशव्यांपैकी 347 पिशव्यांमध्ये खोटे सोने, तर इतर 20 पिशव्यांमध्ये सोन्याच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज मंजूर करत बँकेची फसवणूक व 5.30 कोटींच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी 159 कर्ज खातेदारांसह गोल्डव्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे शेवगाव शाखाधिकारी अनिल वासुमल आहुजा (वय 56) यांनी याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरण चर्चेत आहे. पहिल्यांदा फेब्रुवारी 2020 मध्ये शेवगाव शाखेतील 380 पिशव्यांचे लिलाव आयोजित करण्यात आले होते. यात 6 लिलाव पार पडले. नंतर तीन पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यामुळे लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली होती. इतर पिशव्यांमध्येही बनावट सोने आढळून येण्याची शक्यता असल्याने त्याची शहानिशा, तपासणी व पूनर्मुल्यांकन करण्यासाठी व्यवस्थापकीय समितीने 15 फेब्रुवारी 2020 रोजी तपासणी अधिकारी म्हणून मनोज फिरोदिया यांची नियुक्ती केली होती. 


बँकेने नोटीस दिल्यानुसार 364 सोनेतारण पिशव्यांमधील दागिन्यांच्या लिलावाची प्रक्रिया 23 जून 2021 रोजी लिलावाची प्रक्रिया गोल्डव्हॅल्युअर व खातेदारांच्या अनुस्थितीत पार पडली. त्यासाठी बँकेने कृष्णा गोपीनाथ डहाळे यांची गोल्डव्हॅल्युअर म्हणून नियुक्ती केली. पंचांसमक्ष लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या पाचही पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळून आले. त्यानंतर लिलाव प्रक्रिया थांबविण्यात येऊन 24 ते 29 जून या कालावधीत इतर पिशव्यांमधील दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यात 364 पैकी 20 पिशव्यांमध्ये काही दागिने सोन्याचे आढळून आले. गोल्ड व्हॅल्युअरने त्याचे मूल्य 11 लाख 29 हजार 480 रुपये दाखविले होते. मात्र, त्याची तपासणी केल्यावर वजनात तफावत आढळून आली. या 20 पिशव्यांमधील दागिन्यांचे मूळ व्हॅल्युएशन 3 लाख 48 हजार 880 रुपये असल्याचे समोर आले. तर इतर 344 पिशव्यांमधील दागिने बनावट आढळून आले.

. त्यामुळे एकूण 159 कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर विशाल दहिवाळकर यांनी व त्यांना सहकार्य करणार्‍या इतरांनी बँकेत तब्बल 27 किलो 351 ग्रॅम बनावट सोनेतारण ठेवून कर्जापोटी एकूण 5 कोटी 30 लाख 13 हजारांच्या रकमेची उचल घेऊन त्याची परतफेड न करता बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व कर्जाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शेवगाव शाखेचे शाखाधिकारी अनिल आहुजा यांनी शेवगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 159 कर्जदारांसह गोल्ड व्हॅल्युअर व इतर सहकार्य करणार्‍यांविरोधात  गु.र.नं.460/2021 प्रमाणे कलम 420, 409, 465, 468, 470, 471 व 34 अन्वये संगनमताने फसवणूक, रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील करत आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only