Tuesday, August 24, 2021

आरटीई प्रवेशाचा खेळखंडोबा गटशिक्षणाधिकार्‍यांना खुर्चीला हार घालून गांधीगिरी

 आरटीई प्रवेशाचा खेळखंडोबा

गटशिक्षणाधिकार्‍यांना खुर्चीला हार घालून गांधीगिरी

नगर, ता.24- मागील तीन वर्षांपासून आरटीई अंतर्गत प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. या प्रवेशांचा शिक्षण विभागाने खेळखंडोबा केला आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवकचे गजानन भांडवलकर, नीलेश बांगरे, विशाल म्हस्के यांनी आंदोलन करीत गटशिक्षणाधिकारी सोनार यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली. यावेळी सोनार हे सहलीवर असल्याचे निदर्शऩास आले. 

आरटीई प्रवेशासंदर्भात मागील तीन वर्षापासून शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सोनार व शाळा संचालक यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. आजच्या तारखेपर्यंत एकाही कर्मचार्‍याची हजेरी रजिस्टरवर सही नसल्याचे दिसून आले आहे. शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, आस्थापना विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयात केवळ तीनच हजेरी रजिस्टर उपलब्ध होते. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला येऊन खुर्चीस हार घालून गांधीगिरी करण्यात आली. दरम्यान, कोणाच्या परवानगीने कार्यालयात प्रवेश दिला म्हणून सोनार यांच्याकडून महिला कर्मचार्‍यास निलंबनाची धमकी देण्यात आली, असा आरोप नीलेश बांगरे यांनी केला. तसेच महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचे ते म्हणाले. महिला कर्मचार्‍यांचे देवरे होऊ देणार का? असा सवाल भांडवलकर यांनी उपस्थित केला.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only