Saturday, August 7, 2021

खा.डॉ.सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांनी केली उड्डाण पुलाच्या कामाची पाहणीखा.डॉ.सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांनी केली उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी


खा.डॉ.सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांनी केली उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी


नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल वाहतुकीस लवकरच सुरू होणार -खा.डॉ.सुजय विखे


अहमदनगर प्रतिनिधी- नगर शहरातील बहुचर्चित सुमारे साडेतीन किलोमीटरच्या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. लवकरच उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन या पुलावरून वाहतूक सुरू होईल,हा उड्डाणपूल सक्कर चौक ते स्टेट बँक चौकापर्यंत आहे.उड्डाणपुलाचे अनेक खांब तयार आहे आता लवकरच या खांबावर स्लॅप टाकण्याचे काम सुरू होणार आहे, उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी खा.डॉ.सुजय विखे पाटील व आ.संग्राम जगताप यांनी आज केली यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक पै.सुभाष लोंढे, नगरसेवक मनोज कोतकर,मा.नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे,अजय चितळे,संभाजी पवार, गणेश नन्नवरे, संतोष ढाकणे, संतोष लांडे, वैभव वाघ, वैभव ढाकणे,मळू गडाळकर, ओंकार घोलप,सागर गुंजाळ तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

           यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, या उड्डाणपुलामुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. होणारे अपघातही टळतील हा उड्डाणपूल नगर शहराच्या वैभवात भर पाडेल, यापुढील काळातही अशाच विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only