Tuesday, August 17, 2021

जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


नगर :नाशिक विभागातील पोलिस निरीक्षक अधिकार्‍यां बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक अश्वती दोर्जे यांनी काढले आहेत. यात नगर जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, चार नवीन पोलिस निरीक्षक जिल्ह्यात नियुक्त कले आहेत. तिघांना मुदतवाढ देण्यात आली आहे.


कोपरगावचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव, संगमनेर तालुका पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलिस निरीक्षक वसंत पथवे याची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. कोतवालीचे राकेश मानगावकर यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अभय परमार यांची सेवानिवृत्ती नजीकच्या काळात असल्याने त्यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे.


जिल्ह्यात भिमराव नंदुरकर (जळगाव), विजयसिंह रजपूत (नंदुरबार), नरेंद्र भदाणे (नाशिक ग्रामीण), गुलाबराव पाटील (नाशिक ग्रामीण) या चार अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only