Friday, August 6, 2021

कोविड सेंटर चालक, प्रतिष्ठीत डॉक्टर, लॅबविरुद्ध याचिका; खंडपीठाकडून नोटिसा


 नगर दि.6 प्रतिनिधी

कोरोनाचे बोगस RTPCR रिपोर्ट बनवल्याबाबत क्रस्ना लॅब, विखे पाटील हॉस्पिटल विळद घाट आणि कोरोना नसताना कोरोना भासवून चुकीचे उपचार करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि  नगर कोविड सेंटर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजि लॅब यांच्या विरुद्ध संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.


अशोक खोकराळे यांनी ही रिट याचिका दाखल केली आहे. अशोक खोकराळे यांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२० रोजी वडिल बबनराव खोकराळे यांना घश्यात खव खव आणि पोटात दुखू लागल्यामुळे अहमदनगर कोविड सेंटर मनमाड रोड सावेडी येथे भावाबरोबर तपासणी करण्यासाठी पाठवले. डॉ सचिन पांडोळे यांना कॉल करून पाठवले होते. दुसऱ्या दिवशी वडिलांना घरी सोडतो सांगून डॉ सचिन पांडोळे, डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर आणि इतर यांनी अशोक खोकराळे व इतर नातेवाईकांना कुठलीही कल्पना न देता दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी न्यूक्लिअस हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी येथे बबनराव खोकराळे यांना शिफ्ट केले. दुर्दैवाने १८ ऑगस्ट २०२० रोजी बबनराव खोकराळे यांचा न्यूक्लिअस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.


वडिलांच्या मृत्यूनंतर अशोक खोकराळे यांना अहमदनगर कोविड सेंटर आणि न्यूक्लिअस हॉस्पिटल यांनी बबनराव खोकराळे यांच्यावर उपचार केलेल्या सर्व फाईल दिल्या. यानंतर अशोक खोकराळे यांनी वडिलांवर योग्य उपचार झालेत की नाही, या करिता काही त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना वडिलांची उपचार केलेल्या फाईल दाखवल्या. नंतर त्या मधील जे रिपोर्ट्स आहेत, त्या वरून वडिलांवर चुकीचे उपचार झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या वडिलांना कोरोना नसताना कोरोना उपचार केले असल्याचे रिपोर्ट वरून दिसून येत असल्याचं सिद्ध होत असल्यामुळे डॉक्टरच्या हलगर्जी पणामुळे आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे उपचार करणारे डॉक्टर्स तुमच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सांगितले. यावरून खोकराळे यांनी वडिलांच्या सर्व उपचारांच्या फाईल घेऊन न्याय मागण्यासाठी मा. आरोग्य मंत्री राजेश टोपे, अहमदनगर पोलीस प्रशासन, मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, मा. आयुक्त महानगरपालिका, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, इंडियन मेडिकल कौन्सिल, या सर्व ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.


याच दरम्यान अशोक खोकराळे यांनी वडील बबनराव खोकराळे यांची कोरोना तपासणी नगरमध्ये कुठल्या लॅब मध्ये झाली आहे, का याची चौकशी चालू केली असता, त्यांना बबनराव खोकराळे यांचे दिनांक १३ ऑगस्ट २०२० व दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजीचे क्रस्ना लॅब, विळद घाट, विखे पाटील हॉस्पिटल येथे असे दोन कोरोना RTPCR तपासणी झाल्याचे RTPCR रिपोर्ट मिळाले. सदर रिपोर्टच्या बिलावरील मोबाईल नंबर अनोळखी असल्यामुळे अशोक खोकराळे यांनी सदर दोन्ही नंबरवर फोन करून विचारपूस केली असता एक योगेश उन्हाळे आणि दुसरा राजू सावंत यांचे ते रिपोर्ट असल्याचे लक्षात आले. 

त्यामुळे सदर RTPCR रिपोर्ट हे वडिलांचे नसून इतर जणांचे आहेत आणि हे वडिलांच्या नावाचे बोगस RTPCR रिपोर्ट बनवण्यात आले आहेत, असे लक्षात आल्यावर अशोक खोकराळे यांनी MIDC पोलीस स्टेशन अहमदनगर येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी कोरोना RTPCR रिपोर्ट बनवल्याप्रकरणी क्रस्ना लॅब आणि ज्यांनी हे खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूस न्यूक्लिअस हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड येथील डॉ गोपाळ बहुरूपी, डॉ सुधीर बोरकर तसेच अहमदनगर कोविड केअर सेंटर मनमाड रोड, सावेडी येथील डॉ. पांडोळे आणि इतर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजि लॅब, बालिकाश्रम रोड येथील डॉ मुकुंद तांदळे यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीत वर्षभर पाठपुरावा करून सुद्धा कुठेही प्रगती नसल्यामुळे, तसेच बोगस RTPCR कोरोना रिपोर्ट बनवले बाबत दाखल केलेल्या गुह्यातही प्रगती नसल्यामुळे अशोक खोकराळे यांनी खंडपीठात धाव घेऊन याचिका (रीट पिटिशन) दाखल केली.


खंडपीठाने नगर कोविड केअर सेंटरचे डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षदीप झावरे, डॉ. पटारे आणि इतर, तसेच न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. गोपाल बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर आणि ग्लोबस पॅथॉलॉजि लॅबचे डॉ. मुकुंद तांदळे यांना 4 ऑगस्ट रोजी नोटीसा बजावल्या आहेत. खोकराळे यांच्या वतीने औरंगाबाद येथील अॅड. अजित काळे यांनी काम पाहिले.


अशोक खोकराळे यांची प्रतिक्रिया 

माझ्या वडिलांच्या मृत्यूस जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याशी हा माझा कायदेशीर लढा आहे आणि हा कायदेशीर लढा मी न्याय मिळेपर्यंत आणि दोषींना कायदेशीर शिक्षा होईपर्यंत चालू ठेवणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक डॉक्टर्स यांना मी दैवरूपी मानतो, ते सर्व देवाचं दुसरं रूप आ

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only