Wednesday, August 25, 2021

कर्मचाऱ्यांच्या अन्यायाबाबत भीम आर्मी व सफाई कामगारांचे जिल्हा रुग्णालयात आंदोलन सुरू


 कर्मचाऱ्यांच्या अन्यायाबाबत भीम आर्मी व सफाई कामगारांचे जिल्हा रुग्णालयात आंदोलन सुरू

दिनांक 25 प्रतिनिधी शासन निर्णयानुसार सफाई कामगारांचे आदेश डावलून अन्य वर्गातील उमेदवाराला नियुक्त दिले असून ते पद तात्काळ रद्द करावे यासाठी आज जिल्हा रुग्णालय मध्ये भीम आर्मी व सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यास सुरुवात झालेली आहे.यावेळी भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष तानसेन बिलाल, महिला आघाडी  जिल्हाध्यक्ष मुन्ना ताई चावरे, जिल्हा संघटक मनोज शिरसाट ,सनी काकडे, शाखा अध्यक्ष सचिन भेद, संतोष फलाने संतोष बेद, सुरज चव्हाण, विशाल चव्हाण, अनिल नरवाल, आदींसह कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.


नेवासा येथील वर्ग 4 या पदावर सफाई कामगार मयूर मोहोळकर यांची 7 जून  रोजी नियुक्‍ती करण्यात आलेली आहे ,परंतु लाड पागे समितीच्या शासन मान्य धोरणानुसार सफाई कर्मचारी म्हणून सेवा नियुक्त म्हणून अथवा स्वेच्छा निवृत्त सेवेनंतर  त्या पदाचा लाभ घ्यावा मात्र येथील जिल्हा रुग्णालयाने सर्व नियम डावलून मयूर मोहोळकर हे हिंदू माळी या समाजातून असल्या कारणाने त्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे, एक प्रकारे शासन निर्णयाचा अवमान करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सेवा मुक्त करून सफाई कर्मचाऱ्याचे पद  भरावे अशी मागणी यावेळी करून भीम आर्मी व कर्मचारी संघटनेने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मध्ये आंदोलन सुरू केले आहे.


तर दुसरीकडे करोनाच्या काळामध्ये सफाई कामगार यांचे निधन झालेले आहे ,अशा सहा कुटुंबातील व्यक्तींना व त्याच्या वारसांना नोकरी अद्याप पर्यंत दिलेली नाही ,ती सद्धा तात्काळ द्यावी अशी मागणी  करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only