Tuesday, September 7, 2021

नगर शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी


 नगर दि 7 प्रतिनिधी गेल्या दोन दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेवगाव ,पारनेर तालुक्यात दहा कोटीचा प्रकार घडलेला आहे आज नगर शहरामध्ये जोरदार पाऊस दोन तास झाल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आणि ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.


हवामान खात्याने पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता आज नगर शहरामध्ये दुपारनंतर जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला पाऊस जोरदार झाल्यामुळे सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती तर अनेक ठिकाणी घरा घरा मध्ये पाणी शिरल्यामुळे मोठी कसरत नागरिकांना करावी लागली.


शेवगाव पाठोपाठ जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका सुद्धा ढगफुटी झालेले आहे गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सद्धा आता होऊ लागलेली आहे. शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे येथील चितळे रोड दिल्लीगेट आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते त्यातच नगर शहरांमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे स्टेशन रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर खड्डे पडल्यामुळे तिथेही पाणी साचले होते. केडगाव सावेडी एमआयडीसी आदींसह नगर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस संध्याकाळनंतर सुरू होता
सोमवार दि. 6 सप्टेंबरला रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे ढवळपूरी, वनकुटे, पळशी, खडकवाडी परिसरात रस्ते, शेती मालाचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान ढवळपूरी ते वनकुटे व वनकुटे ते पळशी या गावांदरम्यानचे काळू नदीवरील दोन पूल वाहून गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे.


वनकुटे गावचे सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांनी सांगितले की, रात्री 11 वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर पहाटे चाडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. संततधार पावसामुळे जिर्ण झालेल्या अनेक घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाळीव प्राण्यांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतामधील शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. 


त्यामुळे तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन महसूल यंत्रणेने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येऊ लागली आहे.


दुर्गम असलेल्या या भागात वनकुटे ते ढवळपूरी तसेच पळशी ते वनकुटे असे ग्रामसडक योजनेमधून रस्ते तयार करण्यात आले असून या मार्गावरील काळू नदीवर बांधलेले पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागाचा संपर्क तुटला असून प्रशासनाने दळणवळणाची तातडीने सुविधा निर्माण करून देण्याची मागणीही पुढे आली आहे.


घरांची पडझड, तसेच शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे आत्मा समितीचे अध्यक्ष तथा वनकुटेचे सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांनी सांगितले. मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर या परिसरासह तालुक्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. 


गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी अशा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकर्‍यांपुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे. या भागात टोमॅटो तसेच डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. जोरदार पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


खरिपाच्या पिकांना जीवनदान


गेल्या दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील कांदा, वाटाणा, बाजरी, मूग यासह इतर पिके धोक्यात आली होती. परंतु दोन दिवसापासून पारनेर तालुक्यातील अनेक भागात कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना काही ठिकाणी जीवनदान मिळाले आहे तर सोमवारी रात्री झालेल्या पावसाने खडकवाडी, पळशी, वनकुटे, ढवळपुरी येथील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पिके पाण्यात उभी आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only