Wednesday, September 15, 2021

दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून एक लाख रुपये चोरुन नेल्याची धक्कादायक घटना

 


नगर दि. 15 प्रतिनिधी 

दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून एक लाख रुपये चोरुन नेल्याची धक्कादायक घटना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विलास शिंदे (रा. कायनेटिक  चौक नगर) हे त्यांच्या कामानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारी आले असता त्यांनी त्यांचे मित्राच्या दुचाकीच्या (क्र. एमएच 16 सीएल 9919) डिक्कीत एक लाख रुपये ठेवले होते. अज्ञात चोरट्याने डिक्कीचे लॉक तोडून ही रक्कम लांबविली.  शिंदे हे गाडी जवळ गेल्यानंतर त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन जण पैसे चोरून घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भिंगार काम करत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only