Friday, September 17, 2021

भिंगार येथील पोलीस खात्याच्या जागेची अधीक्षक मनोज पाटील यांनी केली पाहणी

 
नगर दिनांक 18 प्रतिनिधी 


नगर शहरातील भिंगार उपनगरांमध्ये नगर पाथर्डी रोड वर असणाऱ्या पोलीस दलाच्या जागेची आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाहणी करून येथील असलेल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.


यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे ,भिगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख ,पोलिस निरीक्षक भोसले आदी या वळी उपस्थित होते.


आज भिंगार येथील विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आले होते, त्यांनी या ठिकाणी येऊन बंदोबस्ताची पाहणी केली. त्याच दरम्यान नगर पाथर्डी महामार्गावर पोलिसांची एक जुनी वसाहत आहे. या ठिकाणी पोलीस खात्याची साडेपाच एकर जागा या ठिकाणी आहे .तेथे सध्या काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी अधीक्षक पाटील यांनी या ठिकाणी गेले होते,आज या जागेची जाऊन समक्ष पाहणी केली ,पाथर्डी रोडवर व तसेच नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाण्यासाठी रोड या ठिकाणी आहे. या ठिकाणी पोलिसांची जुनी घरे होती सध्या तिथे कोणती वास्तव्य करत नाही, साधारणता साडेपाच एकर जागा ही पोलिसांच्या मालकीची असल्यामुळे या ठिकाणी त्या जागेचा वापर काही करता येईल का याकरता ही पाहणी करण्यात आली. पूर्वी या ठिकाणी किती लोक राहत होते वहिवाट कशापद्धतीने आहे सध्या या जागेचा वापर कशा पद्धतीने होतो याची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली


यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस खात्याची भिंगार येथे साडेपाच एकर जागा आहे, तर दुसरीकडे बाजार तळापाशी सुद्धा एक जागा आहे. या दोन्ही जागेची आम्ही आज पाहणी केलेली आहे. ज्या साडेपाच एकर जागेमध्ये पूर्वी पोलिसांसाठी राहण्याकरता जुनी वसाहत आहे. त्या वसाहती चे सध्याचे बांधकाम पाहता या ठिकाणी नव्याने बांधकाम उभारता येईल का याच्या सुद्धा विचार करण्यात येणार आहे तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची जागा सुद्धा अपुरी पडत असल्यामुळे काही विभागांसाठी या ठिकाणी काही कार्यालय सुरू करता येईल का, तसेच अधिकार्‍यांसाठी राहण्याकरता बांधकाम करता येईल का याच्या सुद्धा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे, येथे बाजार तळापाशी दुसरी जागा आहे ती अतिशय छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा काही वेगळा विचार करता येईल का असे वेगवेगळे विषय आहेत. नव्याने बांधकाम करायचे असल्यास त्याची परवानगी व निधी सुद्धा उपलब्ध पाहिजे,यासाठी नियोजन करणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले .


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only