Friday, September 17, 2021

आज नगर शहरामध्ये पुन्हा एकदा मुख्य बाजारपेठेतच कंटेनर घुसल्यामुळे एकच पळापळ झाली.

 नगर शहरात पुन्हा घुसला कंटेनर


नगर शहरामध्ये अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील सुद्धा आजही अनेक वाहने सर्रास पणे येत आहे, विशेष म्हणजे 
आज नगर शहरामध्ये पुन्हा एकदा मुख्य बाजारपेठेतच कंटेनर घुसल्यामुळे एकच पळापळ झाली.


नगर शहरांमध्ये सध्या उड्डाण पुलाचे काम चालू असल्यामुळे अवजड वाहतूक  बंदी घालण्यात आलेली आहे, असे असतानादेखील सुद्धा आज नगर शहरामध्ये सर्जेपुरा मार्गातून कंटेनर थेट शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या कापडबाजार पर्यंत आल्यामुळे एकच खळबळ उडाली संबंधित चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.


मागील महिन्यामध्ये रात्रीचा सुमाराला असाच एक कंटेनर नगर शहराचा कापड बाजारापर्यंत घुसला होता त्या वेळात दुकाने बंद होती त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नव्हती वास्तविक पाहता शहरामध्ये अशाप्रकारे अवजड वाहने आल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only