Friday, September 3, 2021

पारनेरच्या दुर्गम भागात बनावट नोटांची छपाई; आरोपी अटकेत

 पारनेरच्या दुर्गम भागात बनावट नोटांची छपाई; आरोपी अटकेतपारनेर(सा.वा.)तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश रोकडे (वय१९,वडगाव सावताळ, पारनेर) बनावट नोटांची छपाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

     गेल्या आठवड्यात एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.यातील आरोपी विकास रोकडे बनावट नोटा छापत असल्याचा पोलिसांना संशय होता.परंतु तो हा उद्योग नेमका कोठे करतो याबाबत स्पष्टता नव्हती.

'एटीएम' प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक एच.एन.उगले यांनी आरोपी रोकडे याच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ५०० व १०० रूपये दराच्या बनावट नोटा व बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग,छपाईचे यंत्र,विशीष्ट कागद,कात्री इत्यादी साहित्य आढळले.बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी पारनेर पोलिसांनी विकास रोकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only