Sunday, September 5, 2021

गुटख्यासह 15 लाखांचा माल जप्त
 नगर दिनांक 5 प्रतिनिधी 


नगर जिल्ह्यामध्ये अवैधरीत्या गुटखा बाळगण्याचे तसेच विक्रीचे प्रकार वाढत असल्याने नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अरणगाव शिवारामध्ये कारवाई करत गुटखा, तंबाखू व दोन टेम्पोसह पंधरा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.


शेख नासिर अहमद चाँदमिया, (वय- 44 वर्षे, रा. गाडेकर गल्ली, भिंगार, टेम्पो नं. एमएच-16-सीसी-4920 वरील चालक, 2) शेख अय्याज नसीर, (वय-39 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार),  आबेद नासिर शेख, (वय-34 वर्षे, रा. नागरदेवळे, ता. नगर), सय्यद असीफ महेमूद, (वय- 42 वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार),  सादीक खान इमाम पठाण, (वय- 48 वर्षे, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा, ता. नेवासा),  शेख नूर अब्दुल रऊफ, (रा. मोमीन गल्ली, भिंगार (पसार)) अशी गुन्हा दाखल झालेल्यची नावे आहेत.


जिल्ह्यामध्ये गुटखा विक्री सर्रासपणे चालू आहे. या अगोदर सुद्धा अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या घटना ताज्या असतानाच नगर जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यांच्या पथकाला नगर तालुक्यातील आरंगाव शिवारामध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी पहाटेच्या सुमाराला दौंड मार्गावर अरणगाव चौकात दोन गाड्या थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर यामध्ये गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी हिरा कंपनीचा गुटखा, रॉयल कंपनीची तंबाखू असा महाराष्ट्रामध्ये विक्रीला प्रतिबंध असलेला माल हस्तगत केला. दोन चार चाकी गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी एकूण 15 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल व पाच आरोपींना अटक केली आहे.


याप्रकरणी कमलेश हरिदास पाथरुट (वय- 30 वर्षे, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सफो मन्सूर सय्यद, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पोना शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ राहूल सोळंके, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only