Thursday, September 2, 2021

प्रवरेच्या आयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासले

 


प्रवरेच्या आयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासले 


              डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मागील ५ वर्षातील थकीत देणी मिळविण्यासाठी विविध आंदोलन करून प्रवरेच्या कामगारांना चले जावचा इशारा देऊनही संलग्न संस्थेत कामावर आलेल्या हिशोबनीस अविनाश खर्डे यास संतप्त कामगारांनी काळे फासून निषेध व्यक्त केला. शुक्रवार (आज)पासून कामगारांची मुलेही आंदोलनात सहभागी होऊन तहसिल कार्यालयामोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

              डॉ.तनपुरे कारखाना कामगारांच्या आंदोलनाच्या दहाव्या दिवशी प्रवरेच्या आयात कामगारांना चले जावं चा इशारा दिला होता. प्रवरेचा एकही कामगार कामावर आल्यास त्यासा काळे फासण्याचा  इशारा इंद्रभान पेरणे यांच्यासह कामगारांनी दिला होता. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी आंदोलक कामगारांनी कारखान्याच्या संलग्न संस्थेत प्रवरेचे कामगार आले की नाही? याची शोध मोहीम राबविली.विवेकानंद नर्सिंग होममध्ये अविनाश खर्डे नामक प्रवरेचा कर्मचारी बाहेरच्या बाजूने कडी लावून आतमध्ये डॉ.तनपुरे कारखान्याच्या हिशोबनीसाचे काम करीत होता. राहुरीच्या कामगारांनी त्यास बाहेर घेऊन विवेकानंद नर्सिंग होमच्या प्रांगणात आणले.प्रवरेच्या कामगारांचा जाहीर निषेध करून खर्डे या कामगारास काळे फासले.यावेळी कामगार नेते पेरणे म्हणाले की, प्रवरेच्या कामगाराला फक्त हा इशारा आहे, यापुढे कामगार कोणते पाऊल उचलतील याचा नेम नाही. त्यामुळे प्रवरेच्या आयात कामगारांनी राहुरीच्या कामगारांच्या भावना समजून घेऊन डॉ.तनपुरे कारखान्याच्या संलग्न संस्थेत कामावर येऊ नये असे भावनिक आवाहन केले आहे.

                दरम्यान काळे फासण्याच्या घटनेनंतर डॉ.तनपुरे कारखान्यातील सुरक्षा अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांशी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, कारखान्यात ३३ कर्मचारी सुरक्षा विभागात काम करत आहेत.त्यामध्ये १० कर्मचारी  कायमस्वरूपी तर २३ कर्मचारी मजूर हजेरीवर आहेत. कारखान्याचा वीज पुरवठा थकीत बिलामुळे खंडीत केला आहे. त्यामुळे अंधारात अवघ्या दोन बॅटऱ्यावर कारखान्याची सुरक्षा सांभाळावी आहे. सुरक्षा कर्मचारी दिवसरात्र काम करून हि इतर कामगारांप्रमाणे आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुरक्षा विभागाचे ४८ पगार थकलेले आहेत. केवळ आमची आई म्हणून आम्ही सर्व कर्मचारी कारखान्याची सुरक्षा सांभाळत आहे. पोटाचा प्रश्न असल्याने पोटतिडकीने प्रसार माध्यमासमोर आमची भूमिका मांडली आहे. विद्यमान संचालक मंडळाने सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करू नये असे भावनिक आवाहन सुरक्षा रक्षक विठ्ठल म्हसे यांच्यासह बाळासाहेब तनपुरे, शामराव माने, गोरख पवार, रावसाहेब खांदे, विजय माने, मच्छीन्द्र महाडिक , बाळासाहेब पवार, अशोक गाडेकर, भीमा कोळेकर, अशोक कदम आदिंसह सुरक्षा कर्मचाऱ्यानी केले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only