Thursday, September 2, 2021

घरफोडी करणारे दोघे मुद्देमालासह जेरबंद

 
घरफोडी करणारे दोघे मुद्देमालासह जेरबंद

नगर, ता.2- भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरी करणार्‍या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह जेरबंद केले. चैतन्य बलभीम कांबळे (वय 19, रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) व एक अल्पवयीन मुलगा या दोघांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश इंगळे, सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोकॉ रोहिदास नवगिरे, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पाथर्डी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर तपास करताना पोनि कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा राहुल पगारे (रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) व त्याच्या साथीदारांनी केला आहे. पोनि कटके यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने पगारे याचा कासार पिंपळगाव परिसरात शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. आरोपीच्या साथीदारांबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिस पथकाने शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी चैतन्य कांबळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा राहुल पगारे व आणखी दोन साथीदारांसह केल्याची माहिती दिली. पोलिस पथकाने आरोपींचा शोध घेऊन एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या अन्य साथीदाराचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील मोबाईल, गव्हाच्या दोन गोण्या असा मुद्देमाल हस्तगत केला.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only