Wednesday, September 1, 2021

बँकेत पडला दरोडा...अवघ्या 5 मिनिटात जमले पाचशेवर नागरिक.. शेंडी गावाने अनुभवले ग्राम सुरक्षा यंत्रणेचे महत्व

 

बँकेत पडला दरोडा...अवघ्या 5 मिनिटात जमले पाचशेवर नागरिक.. शेंडी गावाने अनुभवले ग्राम सुरक्षा यंत्रणेचे महत्व


नगर दि 1 प्रतिनिधी 


गावातील बँकेमध्ये दरोडा पडला..तीन चोरटे आले आहेत, त्यांनी काळे जर्किंन घातले आहे, बँक लुटन्याचा प्रयत्न सुरू आहे..  असा फोन बँकेच्या बकर्मचाऱ्याचा शेंडी येथील ग्रामस्थांना एकाच वेळेला आला, आणि अवघ्या 2 ते 3 मिनीतात पाचशेवर लोक बँकेसमोर गोळा झाले, पोलिसही लगेच आले व त्यांनी बँकेला चारही बाजूने घेरून चोरटे पकडले. नगर तालुक्यातील शेंडी गावात बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा थरार रंगला...अर्थात ही प्रत्यक्ष घटना नव्हती तर पोलिसांनी नव्याने सुरू केलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचे हे प्रत्यक्षिक होते.आज सकाळी मोबाईल वर संदेश मिळाल्यावर अवघ्या मिनिटांमध्ये पोलिस यंत्रणा,गावकरी  सुद्धा काही क्षणात याठिकाणी दाखल होऊन शेंडीच्या इंडियन ओव्हरसीज  बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तीन जणांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले. गावकरी मोठ्या संख्येने याठिकाणी जमले होते. ज्या वेळेला त्यांना सदरचा प्रकार हा पोलीस यंत्रणेने सराव म्हणजे मॉक ड्रिल आहे असे  समजले, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

गावामध्ये दरोडा चोरी किंवा नैसर्गिक आपत्ती व अन्य काही घटना घडल्या नंतर पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काही वेळा मध्ये संबंधित ठिकाणी पोहोचते हे पाहण्यासाठी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा योजनेअंतर्गत गावकरी व पोलिसांना एकाच वेळी त्या ठिकाणी घडलेली घटना समजावी व तात्काळ त्याचा बंदोबस्त व्हावा या उद्देशाने पोलिसांनी त्या प्रकारचे ऍप सुद्धा तयार केलेले आहे संबंधित नंबरला संपर्क केल्यानंतर लगेच यंत्रणा संबंधित ठिकाणी पोहोचते व गावकरी सुद्धा या ठिकाणी येतात अशी ही संकल्पना असून एक प्रकारे नागरिकामा जागृत ठेवण्याचे सुद्धा काम या माध्यमातून होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून एक नवीन असे अप पोलिसांनी तयार केलेले आहे यामध्ये त्यांनी गावांमध्ये एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कशा पद्धतीने माहिती होईल व याठिकाणी पोलिस तसेच ग्रामस्थ सुद्धा हे त्या ठिकाणी कश

लगेच येऊ शकेल हा त्यामागचा उद्देश आहे जेणेकरून संबंधित चोरी असो किंवा इतर कोणती घटना असो त्याचे निराकरण तात्काळ होईल व अनेक गुन्ह्यांना आळा बसेल हा त्या मागचा उद्देश आहे.


आज नगर तालुक्यातील शेंडी या गावाजवळ सकाळी साडेअकराच्या सुमाराला असणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँक लुटीचा प्रकार घडलेले आहेत दरोडेखोर आत मध्ये गेलेले आहे अशा प्रकारचा मेसेज पोलीस यंत्रणेमार्फत ग्रामस्थांना मिळालेला होता काही क्षणात एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील शेंडी गावात सर्व गावाला आपात्कालीन परिस्थितीत एकाच वेळी सूचना देणे, निरोप देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा असणाऱ्या ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक (Moc Drill)  नगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आले.


आज बुधवार दिनांक 01 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास शेंडी गावातील इंडियन ओव्हरसीज बँकेत नियमित आर्थिक व्यवहार सुरु असतांना तीन अज्ञात हत्यारबंद इसम बँकेत दरोड्याच्या उद्देशाने प्रवेश करतात. बँकेशेजारील दुकानदार  यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर वर (18002703600) कॉल करून सर्व गावाला सावध केले. त्यांचा कॉल ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तत्काळ शेंडी गावाच्या हद्दीतील 1500 नागरिक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे सर्व 55 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाहि घटनेची माहिती मिळाली, दरोडेखोरांचे वर्णन कळाले. पोलिसांनीही ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले. व 10 मिनिटांत गावात पोलीस हजर झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने सावधानता घेत बँकेचा घेराव केला. पोलिसांनी दरोडेखोरांना बँकेतून बाहेर येण्याचे वारंवार आवाहन केले. बँकेतून दरोडेखोर बाहेर येताच उपस्थित नागरिक व पोलिसांनी सदर चोरांना जेरबंद केले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.


पोलिसांनी सर्व नागरिकांना सविस्तर माहितीसाठी गावात एकत्रित करून मार्गदर्शन केले व नागरिकांना ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्राम सुरक्षा यंत्रणा हि संकल्पना  मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक नगर यांचे मार्गदर्शनात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांत कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेत सर्वच गावांनी कायम स्वरूपी सहभागी राहण्याचे मान्य केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री डी.के. गोर्डे यांनी प्रात्यक्षिकानंतर सर्व ग्रामस्थांना यंत्रणेच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.


ग्रा

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only