Thursday, September 9, 2021

श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षकांसह शहरातील दोन पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

 नगर : जिल्ह्यातील तीन वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षक म्हणून स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती झाली आहे. तसेच नगर शहराचे उपअधीक्षक विशाल ढुमे व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांचीही बदली झाली आहे.


श्रीरामपूर येथील अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक) येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर त्यांच्या जागेवर आंबेजोगाई येथून स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहर येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांची सोलापूर शहर येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर पिंपरी-चिंचवड येथील सहाय्यक पोलिस आयुक्त संजय नाईक-पाटील यांची नगर पोलिस मुख्यालयात उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only